________________
१२८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ आहे. अशा माणसाला दीक्षा कशी पेलणार ?' ह्यावर, महाराज श्री स्मितपूर्वक आत्मविश्वासाने म्हणालो 'ह्याला आणखी सहा महिन्यानंतर पहा' ह्यावर सर्वांना गप्प बसणे प्राप्त झाले.
___ इ. स. १९५४ मार्च महिन्यात म्हणजे फाल्गुनच्या अष्टाह्निक पर्वात दीक्षाविधी संपन्न झाला. चैत्र वैशाख संपेपर्यंत त्यांचा आजार देखील कोणत्याही उपचाराशिवाय संपुष्टात आला. पुढच्या सहा महिन्यांत तर पाटील गृहस्थाश्रमात देखील नव्हते असे धष्टपुष्ट दिसू लागले.
___ पूर्वी दीक्षा देऊ नका असे महाराजांना सांगितले होते ते लोक आश्चर्यचकित झाले व महाराजांच्या अनुमानज्ञानाची प्रशंसा करू लागले. ह्या शेडवाळच्या ब्रह्मचाऱ्याला दीक्षा दिल्यानंतर त्यांचे नाव 'श्री आदिसागर' असे ठेवण्यात आले.
तज्ज्ञ डॉक्टर वैद्य सांगू शकले नसते ते श्री आचार्य महाराजांनी सहजस्फूर्त सांगितले व शंभर टक्के सत्य निघाले. आचार्यांची ज्ञानाची निर्मलता ही अशी सातिशय होती.
आचार्यश्रींचा पराकोटीचा त्याग व निरतिचार आचार (चतुर्थकालीन मुनिचर्येचे एक चालते बोलते प्रत्यक्ष प्रतीक)
श्री १०८ वृषभसागर मुनिमहाराज
नसलापूर मुक्कामी स्वाध्याय चालू असताना मुनि लोकांना आहारांत काय काय वस्तु घेता येतात ह्याची सांगोपांग चर्चा निघाली. तेव्हा श्रोत्यांनी महाराजांना स्पष्टपणे विचारले की, " महाराज मुनींना आहारात इतक्या सगळ्या वस्तु घेण्यास प्रत्यवाय नाही असे स्पष्ट लिहिले असताना आपण मात्र गेले ७८ वर्षे केवळ दुधभात आणि पाणीच घेत आहात ह्याचे कारण काय ?” “याचे कारण एवढेच की; देणारे फक्त तीनच वस्तु देतात." श्रोत्यांना हे ऐकून विजेचा तीव्र धक्का बसावा तसे झाले. व ते समजले की, महाराज या तीन वस्तूंखेरीज काही घेतच नाहीत. आणि ही समजूत तर निखालस खोटी व गैरसमजावर आधारलेली होती. पण त्याबद्दल आचार्य महाराजांनी कधी कोणाजवळ 'ब्र' शब्द उच्चारलेला नव्हता.
श्रावकांची केवढी भयंकर चक आणि महाराजांचा केवढा अपूर्व त्याग. सर्वांना घोर पश्चात्ताप झाला. गेल्या संपूर्ण आठ वर्षांच्या मुदतीत असा प्रश्न विचारणारा एक जरी श्रावक निघाला असता तर या आठ वर्षांच्या श्रावकांच्या प्रमादामुळे लादलेल्या उपासमारीतून आचार्य महाराजांची मुक्तता झाली असती. पण महाराजांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्याबद्दल चर्चा केली नाही. आज सहज विषय निघाला म्हणून गैरसमज निघाला. नाही पेक्षा आणखी किती तरी वर्षे हे असेच चालू राहिले असते. आचार्य महाराजांच्या त्यागाची महती कोण व कशी वर्णन करू शकेल ? असा हा संयम व त्यागाचा आदर्श महाराजच उभा करू शकले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org