________________
१३४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ होता. माझ्यावर त्यांचा लोभही होता व त्यांच्या सल्लेखना-मरणाच्या दिवशी तेथे असण्याचा योग मला प्राप्त झाला होता.
गुरूंनाही दीक्षा देणारा शिष्य __ आरंभीच्या काळात श्री शांतिसागर महाराज यांना आमच्या भागाबाहेर फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. अशा वेळी सुद्धा आपल्या निर्दोष चर्येने, उपदेशाने व शांत स्वभावाने त्यांनी जनमानसात वरचे स्थान मिळविले होते. आजूबाजूच्या लोकांची भक्ती त्यांच्यावर फारच असे. त्यांनी मुनिदीक्षा घेतली होती ती वर उल्लेखिलेल्या श्री देवाप्पा स्वामी यांच्याकडून. आचार्य महाराज मात्र निर्ग्रन्थ दीक्षा घेतल्यानंतर निर्वस्त्र राहून निर्लेप चर्या पाळू लागले; इतकेच नव्हे तर पुढे आपल्याच गुरूंना निर्वस्त्र दीक्षा दिली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. श्री देवाप्पा स्वामी यांचा लोभ बालपणी मला मिळाला होता. निर्वस्त्र दीक्षा घेतल्यानंतर ते आमच्या भागात फारसे आले नाहीत व प्रायः श्रवण बेळगोळलाच राहिले; १९३५ साली मी त्यांचे दर्शन घेऊन आमच्या भागात येण्यासाठी त्यांना आग्रह केला. तेव्हा नम्रतेने त्यांनी मला सांगितले, 'मी त्या भागात आता येऊ इच्छित नाही. तिकडे तर आता माझे शिष्य म्हणा अथवा गुरू म्हणा निर्वाण स्वामी शांतिसागर हे आहेतच.'
आचार्यश्रींच्या दर्शनाचे योग आचार्यश्री शांतिसागर महाराज यांचा जन्म पाटील घराण्यात झाला आहे. भोजकर पाटलांचे संबंध मोठमोठ्या पाटील घराण्यांशी असल्यामुळे गळतगा, शेडबाळ, कोगनोळी इत्यादी ठिकाणी लोक आपुलकीच्या भावनेने त्यांचे स्वागत करीत असत. वेळोवेळी महाराजांच्या दर्शनासाठी मी जात असे. मला आठवते. त्यांचा कैशलोच गळतग्याला होता आणि त्यासाठी मी चालत गेलो होतो. त्यावेळची महाराजांची शांत मूर्ती आजही माझ्या स्मरणात आहे. दिवंगत श्री. भूपाल अण्णा जिरगे यांच्या बरोबर एकदा नसलापुरास व दुसऱ्यांदा शेडबाळास मी गेलो होतो. महाराजांचा उपदेश व्यवहारातील उदाहरणांनी परिपूर्ण असे व साधारण लोकांवर त्याचा फार इष्ट परिणाम होत असे. मी कोल्हापूरला नोकरीला आल्यानंतर माझ्या हातून प्रवचनसार, परमात्मप्रकाश वगैरे ग्रंथांचे संपादन झाले व त्यांच्या प्रती महाराजांच्या हातीही पोहचल्या. वर्षातून एकदा तरी मी महाराजांच्या दर्शनास जात असे आणि महाराज माझ्या कामाबद्दल समाधानही व्यक्त करीत. सांगली मुक्कामी महाराजांनी मला सांगितले (ते सदोदित माझ्याबरोबर कानडीच बोलत. कारण भोज व माझे गाव सदलगा ही ५/६ मैलांच्या अंतरावर आहेत आणि तेथे जैन मंडळी कानडीतच बोलतात ) 'तुझे इंग्रजी मला काही समजत नाही.' मी अत्यंत नम्रपणाने सांगितले, आपले पुष्कळच लोक हिंदी-मराठीकानडीतच लिहितात. म्हणून मी इंग्रजीमध्ये लिहू इच्छितो. मला आपले आशीर्वाद असू द्यावेत.
गैरसमज दूर झाला महाराजांचा चातुर्मास समडोळी येथे होता. मी संपादित केलेला आचार्य हरिषेणांचा बृहत्कथा कोष त्यांच्या हाती पोहोचला होता. तो ग्रंथ सिंधी ग्रंथमालेत प्रसिद्ध झाला होता. त्याचवेळी तेथे उपस्थित
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org