________________
॥ ॐ॥
मराठी विभाग
परमपूज्य आचार्य १०८ श्री शांतिसागर महाराजांची
काही संस्मरणे मुनि श्री १०८ आदिसागरजी महाराज, शंडवाळ ( म्हैसूर )
पूज्याति पूज्यैर्यतिभिस्सुवन्धं, संसारगंभीरसमुद्रसेतुम् ।
ध्यानैकनिष्ठा गरिमागरिष्ठं, आचार्यवयं प्रणमामि नित्यम् ।। आचार्य श्री खऱ्या अर्थाने प्रातःस्मरणीय, चारित्रचक्रवर्ती, योगीन्द्रचूडामणि, समाधिसम्राट् होते.
आचार्य श्री बालब्रह्मचारी होते. धैर्यसंपन्न होते. प्रभावशाली आदर्श सत्पुरुष होते. जगास भूषणभूत, सन्मार्गदर्शक, महातपोनिधी महात्मा सदगुरु होते.
आचार्य श्रींनी उत्तर दक्षिण भारतात सर्वत्र संघसहित पदावहार केला. कोनाकोपऱ्यांत आपल्या उपदेशाने मिथ्यांधकाराचा नाश केला. दिगंबर जैनत्वाचा उद्योत केला. उपदेशाने उच्च कुलीनांना तर पापापासून अलिप्त केलेच पण जंगलातील भिल्ल, कोळी वगैरे लोकांना सुद्धा हिंसेपासून परावृत्त केले. स्वामींनी अनेक परिषह सहन करून दिगंबर जैनधर्मीय साधूंचा सर्वत्र विहार करण्याचा मार्ग निष्कंटक केला. आता हा राजमार्ग झाला आहे याचे श्रेय आचार्य श्रींनाच आहे.
(२) आचार्य श्री हे परीषहजयी होते- ऐलक अवस्थेत सन १९१८ साली कोगनाळी (ता. चिकोडी) येथे आणि मुनि अवस्थेत सन १९२३ साली कोण्णूर (ता. गोकाक ) येथे त्यांच्या अंगावर सर्प चढून त्याने दोन-दोन तासपर्यंत वेटोळे घातले तरी त्यांनी आपले आसन चलायमान केले नाही. या प्रमाणे शेडवाळ येथे (ता. अथणी) सर्पाचा, व सौदंत्ती (ता. रायबाग) येथे मुंगी-मुंगळ्यांचा उपसर्ग सहन केला.
१२१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org