Book Title: Tiloy Pannati Part 1
Author(s): Vrushabhacharya, A N Upadhye, Hiralal Jain
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
पू. ब्र. जीवराज गुणगायन - (अ. जीवराज गौतमचंद यांनी अनुवादित केलेल्या ' रत्नकरण्ड श्रावकाचार ' या ग्रंथाच्या
__ प्रकाशन समारंभाच्या वेळी म्हटली गेलेली कविता ) दोशीवंश नभास सूर्यसम जो जो मान्य विद्वज्जना । नाहीं वीर जिनेंद्र-तत्त्वनिचयीं शङ्का च ज्याच्या मना॥ प्रेष्ठिन्, गौतमपुत्र, धन्य जगिं तूं श्रीजिवराजाह्वया । वर्षे शंभर सौख्य लाभुनि तुला जावोत दुःखें लया॥ १ पापें दुःखद आत्मनाश करिती सद्धर्म देतो सुखें । ऐसें जाणुनि अहंदादिचरणीं तूं बा प्रसन्ने मुखें ॥ पापा त्यागुनि सुव्रतें सजविला आत्मा स्वताचा बुधा । सत्यादिव्रतपञ्चकें तुज मिळो स्वानन्दरूपा सुधा ॥ २ वृद्धस्त्री जननीसमान गणिसी बालेस कन्येसम । जी आहे तरुणी तिला स्वभगिनी तूं मानिसी निर्मम ॥ वं ब्रह्मवत पाळिशी मन तुझें स्वच्छोदकासारखें । वर्णायास समर्थ सद्गुण तुझें आम्ही न एका मुखें ॥ ३ नेत्राची उपमा विचार करुनि ज्ञानास देती सुधी । ज्याने नेत्र दिले दिला गुणिवरें त्याने जनांना निधि ॥ ऐसें जाणुनि नेत्र रोगहर तूं बा निर्मिलें आलय । तेणें होशिल सर्वदर्शि तुजला लाभेल सिद्धालय ॥ ४ जी दुःखें करि दूर दुर्गति हरी सन्मार्ग दावी जना । वाणी वीर-मुखोद्भवा अघहरी जी शुद्ध ठेवी मना । जी विद्वजननी तिचा गुणिवरा उद्धार सद्भक्तिन । तूं सर्वस्वसमर्पणे करिशि न त्वत्तुल्य कोणी गुणें ॥ ५ हा माझा पर हा स्वभाव असला स्वार्थीजनी आढळे । निस्स्वार्थी सकलोपकार करितो तेथून तो नाढळे ॥ हे साधो, स्वधनास तूं जनहितासाठी असें अर्पिलें । लाभो तें सुख दीर्घकाल तुजला जे सज्जना लाभलें ॥६ हीराचन्द्र सुनाम धन्य सुगुणी ज्या सत्कुली जन्मले । वाणीभूषण रावजी सुजन हे ज्या सत्कुला लाभले ॥ ऐशा थोर कुलांत गौतमसुता त्वजन्म बा जाहला । सत्कृत्ये तव 'दानवीर' सुपदं संबोधु आम्ही तुला ॥७ मैत्री प्राणिगणी तसा गुणिगणी तूं ठेविशी आदर । रोगें पीडित त्यावरी फिरविशी साधो, कृपेचा कर ॥ जे लोकी विपरीत वृत्ति असती त्यांच्यांत मध्यस्थता । राहे या परि धीर वृत्ति तब ही आम्हा दिसे तत्त्वता ॥ ८ 'श्रीसिद्धान्त प्रवेशिका' विरचिली गोपालदासें बुधे । तैसा तो शुभ 'सार्वधर्म' हि तयें हे सद्गुणांच्या निधे ।। यांचा तूं अनुवाद सुन्दर असा केला तदीयाश्रये । छात्रांना बहुबोध नित्य घडतो नैपुण्य त्यानेंचि ये ॥ ९ केलें । श्रीहरिवंश ' पुण्यचरिती प्राझें तुवा वर्णन । तें साहित्यिक-मान्य गौतमसुता संशीतिचा लेश न || जें सम्पादन जैनबोधकिं' तुवा केलें असें सुन्दर । तेणें जागृति जाहली जिनजनी जी वाढवी आदर ॥ १० दोषांची कणिकाहि जीत न अशी विद्या नि दृष्टि क्रिया । रत्ने तीन समन्तभद्र कथिती जे जाणती सन्नया ।। त्यांचा हा रचिला ‘करण्डक' तयें तो मातृभाषी तुवां । प्रेमाने दिधला सुपाठककरी आनन्द देई नवा ॥ ११ या ग्रन्थे सुचरित्रता तुज मिळे लाभे नृरत्नत्व ही। प्रेमानें अनुवादिला म्हणुनि तो लाभोचि अन्यास ही ॥ ऐसा हा अनुवाद भूवरि तुझा उत्कर्ष रात्रंदिनी | पावो ही 'जिनदास' आस करितो वीरास मी वन्दुनि ॥ १२ राहो देह तुझा समर्थ सुजनी वात्सल्य साधावया । दीर्घारोग्य मिळो तुला जिन-वच:-पीयूष चाखावया ॥ दीर्घायुष्य तुला मिळो शुचि असें चारित्र पाळावया । देवो वीर सुखें विभूषित करी जो मुक्ति-पद्मालया॥१३ २२।८।१९५५ सोलापुर.
-जि. पा. फडकुले
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org