________________
(१९)
इत्यादींची क्रमशः वृद्धी होत जाते.
त्यानंतर उत्सर्पिणी काळाचा 'दुःषम' नामक दुसरा आरा आषाढ कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी सुरू होतो, तो एकवीस हजार वर्षांचा, अवसर्पिणी काळाच्या पाचव्या आन्यासारखा असतो.
जेव्हा दुसरा आरा सुरू होतो तेव्हा भरतक्षेत्रामध्ये सर्वत्र पाच प्रकारची वृष्टी होते. त्या वृष्टीमुळे वनस्पतींमध्ये पाच प्रकारच्या रसांची उत्पत्ती होते. त्यावेळी गुंफेत राहणारी माणसे निसर्गाचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित होतात. आधी तर ते झाडापानांच्या हालचालीनेही घाबरतात आणि गुंफेत पळून जातात. गुंफेतील दुर्गंध त्यांना सहन होत नाही. त्या दुर्गंधाने घाबरून ते पुन्हा बाहेर येतात आणि नंतर निर्भय होऊन वृक्षाजवळ जातात. फळांचा आहार करतात. हा आहार त्यांना अत्यंत स्वादिष्ट लागतो. ते क्रमशः मांसाहार सोडू लागतात. त्यांच्यातून अनेकजण एकत्रित होऊन निश्चय करतात की आता आम्ही भविष्यात कधीच मांसाहार करणार नाही. इतकेच नाही तर त्यांना
मांसाहाराविषयी इतकी घृणा उत्पन्न होते की ते सांगतात आता मांसाहारी लोकांची Shahaty सावलीसुद्धा आमच्यावर पडू देणार नाही. त्यांच्यापासून दूरच राहू. अशाप्रकारे जातीय विभाग होतात आणि सगळे रीतीरिवाज वर्तमानकाळाच्या पाचव्या आयप्रमाणे होतात.
उत्सर्पिणी काळाचा हा दुसरा आरा पूर्ण झाल्यानंतर दुःषम- सुषमा नावाचा तिसरा आरा सुरू होतो. तो एक क्रोडाक्रोडि सागरोपमाला बेचाळीस हजार वर्षे न्यून असतो. तो अवसर्पिणी काळाच्या चौथ्या आयप्रमाणे असतो. तिसऱ्या आऱ्याचे तीन वर्षे साडे आठ महिने पूर्ण झाल्यावर प्रथम तीर्थंकरांचा जन्म होतो. ह्या आऱ्यामध्ये तेवीस तीर्थंकर, अकरा चक्रवर्ती, नऊ बलदेव, नऊ वासुदेव, नऊ प्रतिवासुदेव होतात. वर्ण, गंध, रस इत्यादी शुभ पर्यायांमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत जाते.
नंतर सुषमा नावाचा चौथा आरा सुरू होतो. तो दोन क्रोडाक्रोडि सागरोपमाचा असतो. त्याचे चौऱ्यांशी लक्ष पूर्व, तीन वर्ष, साडे आठ महिने पूर्ण झाल्यावर चोवीसावे तीर्थंकर सिद्ध होतात- मोक्षास जातात. बाराव्या चक्रवर्तीचा आयुष्यकालही पूर्ण होतो. त्यानंतर एक कोटी पूर्व काळ व्यतीत झाल्यावर कल्पवृक्षांची उत्पत्ती होऊ लागते. त्यामुळे मानवाच्या आवश्यकतेची पूर्ती होते. लोकांना काम करावे लागत नाही. युगलिक युगाची सुरुवात होते. बादर (बाह्य) अग्नीचा आणि धर्माचा विच्छेद होतो. सगळे अकर्मण्य होतात. वर्ण, गंध इत्यादी शुभ पर्यायांमध्ये वृद्धी होते.