________________
(१७)
பை மலபார்ப்பவர்
अठरा श्रेणी आणि अठरा प्रश्रेणी अशा प्रकारे छत्तीस जातींची स्थापना करतात. त्या विविध कर्मावर आश्रित असतात. नंतर ते पुरुषांसाठी बहात्तः कला आणि स्त्रियांसाठी चौसष्ट कलांचा उपदेश देतात. असाधू लोकांवर नियंत्रण आणि साधू लोकांसाठी मंत्रिमंडळ तयार केले जाते. साम, दाम, दण्ड, भेद-नीती यांची स्थापना होते.
___ युगलांची बरोबर जन्म घेण्याची व मरण्याची जी सहज व्यवस्था होती ती शिथिल होत जाते. अकाली मृत्यू होऊ लागतात. म्हणून विवाहपद्धतीचा उदय होतो. त्यानंतर लोक आपल्या सहोदराला सोडून दुसऱ्या कन्येबरोबरसुद्धा विवाह करू लागतात. जसजशी मानव समुदायाची वृद्धी होते तसतसा नगरादींचा विकास होऊ लागतो. अशा प्रकारे भरतक्षेत्राची लोकसंख्याही वाढत जाते.
जीवनाच्या अंतिम भागात दीर्घकाळापर्यंत राज्य करणारे भावी तीर्थंकार संसाराचा परित्याग करून दीक्षा घेतात. तपश्चर्या आणि आत्मसाधनेद्वारा चार घाती कर्मांची निर्जरा करतात. केवलज्ञान व केवलदर्शनाची प्राप्ती होते. केवलज्ञान प्राप्त झाल्यावर ते साधू, साध्वी, श्रावक, श्राविका अशा चतुर्विध धर्मतीर्थाची स्थापना करतात. मुनिधर्मातील पाच महाव्रतांचा आणि गृहस्थ धर्मातील बारा व्रतांचा उपदेश देतात. आयुष्य पूर्ण झाल्यावर सिद्ध, बुद्ध, मुक्त होतात.
तिसरा आरा पूर्ण झाल्यावर एका सागरोपमाला बेचाळीस हजार वर्षे न्यून दुःषम-सुषमा नावाचा चौथा आरा सुरू होतो. ह्या आयामध्ये मनुष्याचे आयुष्य एकपल्योपमापेक्षा कमी होत होत एक कोटी पूर्वांचे राहते. दिवसात एकदा आहार करण्याची इच्छा होते.
चौथ्या आऱ्याचे तीन वर्ष, साडेआठ महिने बाकी राहतात तेव्हा चोविसावे तीर्थकर मोक्षास जातात.
चौथा आरा पूर्ण झाल्यावर एकवीस हजार वर्षांचा दुःषम नावाचा पाचवा आरा सुरू होतो. तेव्हा पूर्वीपेक्षा वर्ण, गंध, इत्यादी पर्यायांमध्ये अनंतपटीने हीनता येते. दिवसातून दोन वेळा आहार करण्याची इच्छा होते. अशाप्रकारे क्रमश: -हास होत होत पाचव्या आऱ्याच्या अंतिम दिवशी शकेंद्रांचे आसन चलायमान होते, तेव्हा ते प्राण्यांना संबोधून सांगतात, "उद्या सहावा आरा सुरू होणार आहे, म्हणून सावधान रहा, जे धर्मकार्य करायचे आहे ते करून घ्या, पुढे वेळ फार विषम येणार आहे." शकेंद्रवाणी श्रवण करून उत्तम धर्मनिष्ठ मानव ममत्वाचा त्याग करून अनशनव्रत
ARRBH
USTRABARINATHRIENSTEREOS