________________
(१६)
प्रथम आऱ्यापेक्षा दुसऱ्या आऱ्यामध्ये वर्ण, गंध, रस स्पर्श इत्यादी प्राकृतिक गुणांमध्ये हळूहळू हीनता येऊ लागली. दुसऱ्या आन्याला मनुष्याचे आयुष्य तीन पल्योपमापेक्षा कमी होत होत दोन पल्योपमाचे होते.
तिसऱ्या आऱ्यामध्ये हीनतेचा क्रम हळूहळू अधिक प्रबळ होत जातो. आयुष्य दोन पल्योपमाहून कमी होत होत, एक पल्योपमचे होते. मानवाच्या जीवनात अशांतीचा प्रादुर्भाव होतो. गरजा वाढत जातात. एक दिवसा आड आहार घेण्याची इच्छा होते.
पहिल्या तीन आऱ्यांमध्ये 'युगलिक व्यवस्था' चालते. याच्यात युगल म्हणजे पती-पत्नीची जोडी असते. ते मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी एका युगलाला जन्म देतात. अर्थात पुत्र आणि कन्या बरोबरच जन्म घेतात. ते भाऊ-बहीण मोठे झाल्यावर पतिपत्नीच्या रूपात परिणत होतात. असा क्रम तिसऱ्या आऱ्यापर्यंत चालू राहतो. ते युगल आपल्या बालक आणि बालिकेचे प्रतिपालन, प्रथम आऱ्यातील युगलिक एकोणपन्नास दिवसांपर्यंत करतात; दुसऱ्या आऱ्यातील युगलिक चौसष्ट दिवसांपर्यंत करतात; आणि तिसऱ्या आऱ्याचे युगलिक एकोणांशी दिवसापर्यंत करतात. तिन्ही आऱ्यांच्या युगलिकांचा अंतः शिंक आणि जांभईने होतो.
तिसऱ्या आऱ्याचे, चौऱ्यांशी लाख पूर्व, तीन वर्ष आणि साडेआठ महिने बाकी राहतात, तेव्हा प्रथम तीर्थंकरांचा जन्म होतो.
काळाच्या प्रभावाने भूमीचे रस व भूमीचा कस कमी-कमी होत जातो. कल्पवृक्षांपासून पुरेशा वस्तू प्राप्त होत नाहीत, तेव्हा क्षुधेने पीडित मनुष्यांची व्याकुळता पाहून गृहस्थ अवस्थेत असलेले तीर्थंकर दयाभावनेने स्वभावतः उत्पन्न झालेले चोवीस प्रकारचे धान्य, मेवा इत्यादी मनुष्याला दाखवतात. परंतु कच्चे अन्न खाल्याने त्यांच्या पोटात पीडा उत्पन्न होते. त्यांना अरणीकाष्ठद्वारा अग्नी उत्पन्न करून अन्न शिजवून खाण्याचे अथवा भाजून खाण्यास सांगतात. पण भोळी माणसे अग्नीमध्ये अन्न टाकतात आणि अन्न जळताना पाहून सांगतात की अग्नीचेच पोट भरत नाही तर हे आम्हाला काय तृप्ती देतील? तेव्हा गृहस्थ आश्रमात स्थित तीर्थंकर कुंभकार वर्ग म्हणजे मातीपासून भांडे बनविणाऱ्या वर्गाची स्थापना करतात आणि भांड्यात अन्न शिजवणे शिकवतात.
त्यानंतर स्वर्गातून इंद्र येऊन प्रथम भावी तीर्थंकरांचा अत्यंत आनंदाने व उत्साहाने राज्याभिषेक करतात. ते राज्य संचालनासाठी नगर बनवतात. चार कुळे,