________________
मानवी मनाची जिज्ञासा पुढे वाढत जाते व मानव भौतिक, निरपेक्ष सुखाच्या शोधासाठी अग्रेसर होतो.
२. भारत वर्षात धर्माचा अजस्त्र स्रोत भारत धार्मिक चेतना, चिंतन, मनन आणि साधनेच्या दृष्टीने विश्वातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. जेव्हा जगातील इतर देश केवळ जीवनाच्या भौतिक पक्षाबरोबरच जुळलेले होते, संस्कृतीचा थोडाही विकास झाला नव्हता, तेव्हासुद्धा भारतात संस्कृती आणि धर्माचा अजम्न स्रोत वाहत होता. मोहेंजोदडो, हडप्पा, राजमहल, कालीबंगा इत्यादींच्या उत्खननाने हे सिद्ध होते की हजारो वर्षांपूर्वी येथे विभिन्न क्षेत्रात स्पृहणीय उन्नती झाली होती. भवननिर्मिती, वस्त्रे विणण्याची कला इत्यादी बाह्य विकासाबरोबर येथे परलोकाच्या चिंतनाकडेही लोकांची उन्मुखता होती. केवळ खाऊन पिऊन मौज मानण्यातच मनुष्याचे चिंतन आणि कार्यक्षेत्र सिमीत नव्हते.
म्हणूनच मनूने खूपच प्रेरक शब्दात सांगितले होते की ह्या जगात उत्पन्न होणाऱ्या ज्ञानीजनांपासून जगातील सर्व मानवांनी आपापल्या चारित्र्याची शिकवण ग्रहण करावी.२
भारतामध्ये धार्मिक दृष्टीने प्राचीन काळात जो विकास झाला तो जगाच्या अन्य देशांसाठी वस्तुतः प्रेरक होता. येथे असे ज्ञानी आणि उच्च चारित्रवान पुरुषही होऊन गेले, ज्यांनी सांसारिक वासनेचा त्याग करून ज्ञान आणि साधनेचा मार्ग अंगिकारीला. भौतिक आकर्षणापासून मुक्त राहून स्वतःला चिंतन, मनन आणि आत्मसंशोधनामध्ये लीन ठेवले. त्याच्या परिणाम म्हणून येथे ज्ञानाचा जो विविध रूपात विकास झाला त्यामुळे आगामी काळातही भारतीय जीवनाला फार मोठा आधार ठरला. त्याचे जीवन-चिंतन आचरणयुक्त होते. चिंतन दर्शन आहे आणि चर्या चारित्र्य अथवा क्रिया आहे. थोडक्यात येथील धर्म व अध्यात्माचा स्रोत मंद किंवा तीव्र राहिला परंतु संपूर्णपणे कधीच थांबला नाही.
३. जैन परंपरेचा अनादी स्रोत परंपरेनुसार जैन धर्माला शाश्वत मानले गेले आहे म्हणजे वेळोवेळी जैन धर्माचा कोणत्याही क्षेत्राच्या दृष्टीने जरी लोप झाला असेल तरी तो पूर्णपणे कधी नष्ट झाला नाही. तो अनादी काळापासून चालला आहे आणि चालत राहील.
जम्बुद्वीपप्रज्ञप्ती सूत्रात कालचक्राचे विस्तृत विवेचन आहे. गणधर