________________
(१३)
प्रकरण पहिले जैन संस्कृती, धर्म आणि वाङ्मय
१. मानव-जीवन आणि धर्म संपूर्ण जगाच्या जीवनसृष्टीमध्ये एकमेव मानवच मननशील प्राणी आहे. तो विश्वाचा शृंगार आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असा दुसरा कोणताही प्राणी या विश्वात नाही. असीम सुखात निमग्न राहणारे देवसुद्धा मानवाबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत. मानवाने आपल्या प्रतिभेच्या बळावर ज्या संस्कृती आणि विज्ञानाची नवनिर्मिती केली आहे ती केवळ अद्भूत आहे.
मानवाचा मेंदू पशूप्रमाणे अविकसित नाही. परंतु दिव्याच्या ज्योतीप्रमाणे उज्ज्वल, विकसित व उन्नत आहे. कारण त्याचे विचार अनंत आकाशाप्रमाणे विशाल आहेत, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, चंद्राप्रमाणे सौम्य आहेल, नक्षत्राप्रमाणे सुखदायी आहेत. त्याची इच्छी असेल तर तो पृथ्वीवरसुद्धा आपल्या निर्मल विचाराने आणि पवित्र आचरणाने स्वर्ग आणू शकतो.
आजचा मानव विकासाच्या नव्या वळणावर आहे. त्याच्या मनात सतत ही आकांक्षा असते की आपण नेहमी सुखमय जीवन जगावे, आपल्यावर कधीच दुःखे येऊ नयेत. सुखाच्या शोधात त्याने वेगवेगळी साधने एकत्र केली, शरीर आणि इंद्रियांच्या परितृप्तीसाठी त्याने जे काही अपेक्षित समजले त्या सर्व साधनांना पृथ्वी, समुद्र, पर्वत-शिखरे, आकाशपाताळ येथे एकत्रित केले. परंतु सुखाची त्याच्या मनात जी कल्पना होती ती तो साध्य करू शकला नाही कारण भौतिक पदार्थांपासून मिळणारे सुख नेहमीच सुखरूपात राहत नाही.
ती क्षणिक सुखे चिरकाळापर्यंत दुःखे देणारी असतात.?
भौतिक सुखे जितकी भोगली जातात त्याचा परिणाम दुःखदच होतो. म्हणून विद्वानांनी त्याला परिणामविरस सांगितले आहे. वास्तविक जे भूत, भविष्य आणि वर्तमान-त्रिकाळी सरस परिणामयुक्त असते तेच सुख असते.
ROSERMONOCHER
HERSONALISASARAMERICABINESS
ORDER