________________
ज्ञानी पुरुषांनी कसे विज्ञान निहाळले असेल!!! जगातील लोकांनी गोड मान्यतेमुळे विषयात सुख मानले, त्यांची दृष्टी कशा पद्धतीने विकसित केल्याने विषय संबधित सर्वच चुकीच्या मान्यता दूर होतील आणि महामुक्तदशेचे मूळ कारणस्वरुप असणारे ‘भाव ब्रह्मचर्य'चे वास्तविक स्वरुप यथार्थ समजूतीने खोलवर रुजेल. विषयमुक्तिसाठी कर्तापणाची सर्व भ्रांती तटावी तसेच ज्ञानी पुरुषांनी स्वतः जे पाहिले आहे, जाणले आहे आणि अनुभवले आहे, त्या 'वैज्ञानिक अक्रम मार्गा' च्या ब्रह्मचर्य संबंधीचे अद्भुत रहस्य ह्या ग्रंथात विस्फोटीत झाले आहे!
या संसारवृक्षाला मूळासकट उपटून टाकणारे, आत्म्याच्या अनंत समाधित रमणता करविणारे, निग्रंथ वीतरागदशा प्राप्त करविणारे, वीतरागांनी स्वतः प्राप्त करुन इतरांनाही बोध दिला, असे हे अखंड त्रियोगी शुद्ध ब्रह्मचर्य निश्चितच मोक्ष प्राप्ती करविणारे आहे ! अशा ह्या दुषमकाळात 'अक्रम विज्ञाच्या उपलब्धिमुळे आजीवन मन-वचन-कायेने शुद्ध ब्रह्मचर्ये जोपासले गेले, त्याला एकावतारी पद निश्चितच प्राप्त होईल असे आहे !
शेवटी, अशा दुषमकाळात की जिथे संपूर्ण जगातील वातावरणच विषयाग्निने पसरलेले आहे, अशा परिस्थितीत ब्रह्मचर्य संबंधित 'प्रकट विज्ञानला' स्पर्शेन निघालेली 'ज्ञानी पुरुषांची' अद्भुत वाणी संकलित करुन विषय-मोहपासून सुटून साधनेत राहून, अखंड शुद्ध ब्रह्मचर्याच्या पालनासाठी सुज्ञ वाचकांच्या हातात हा 'समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य' ग्रंथ संक्षिप्त स्वरुपात प्रस्तुत करण्यात आला आहे. विषयाच्या भयंकर परिणामांपासून सुटण्यासाठी तसेच गृहस्थ दशेत राहून सर्व व्यवहार निर्भयतेने पूर्ण करण्यासाठी आणि मोक्षमार्ग निरंतरायपणे वर्तनात(अनुभवात) येईल, यासाठी 'जसे आहे तसे' वास्तविकतेला प्रस्तुत करताना, सोन्याच्या कटार स्वरुपात सांगण्यात आलेली 'समज' ला अल्प प्रमाणातही विपरीततेकडे घेऊन न जाता, सम्यक् प्रकारे त्याचा उपयोग करावा अशी प्रत्येक सुज्ञ वाचकाला अत्यंत भावपूर्वक विनंती! मोक्षमार्गात यथायोग्य पूर्णाहुती करण्यासाठी या पुस्तकाची उपयोगपूर्वक आराधना करावी हीच अभ्यर्थना।
___ - डो. नीरूबहन अमीन
10