________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
79
नाही. माणसाचा दोष नाही, हे कर्मच भटकवते बिचाऱ्याला. पण यात जर शंका ठेवली, तर तो विनाकारण मरतो. ___म्हणून ज्याला बायकोच्या चारित्र्यासंबंधी शांति हवी असेल, त्याने रंगाने अगदी काळीकुट्ट, गोंदलेली बायको करावी की ज्यामुळे तिच्यावर कोणी आकर्षितच होणार नाही. तिला कोणी ठेवणारच नाही, आणि तीच असे म्हणेल की, मला दुसरा कोणी ठेवणारा नाही. हा जो नवरा मिळाला आहे तोच मला सांभाळणार आहे. 'म्हणून मग ती तुम्हाला सिन्सियर (वफादार) राहील. खूपच सिन्सियर राहील. आणि जर ती सुंदर, देखणी असेल तर लोकं तिला (मनाने) भोगतातच. सुंदर असेल तर लोकांची दृष्टी बिघडणारच! जर कोणी सुंदर बायको केली तर मला (दादाश्रींना) हाच विचार येतो की काय अवस्था होईल याची!
बायको खूप सुंदर असते तेव्हाच तो देवाला विसरतो ना?! आणि नवरा खूप सुंदर असतो तेव्हा ती बाई सुद्धा देवाला विसरते! म्हणून सर्व रितसर असलेले चांगले.
हे लोकं तर कसे आहेत? की जिथे 'हॉटेल' पाहिले, तिथे 'खाल्ले.' शंका ठेवण्यासारखे जग नाही. शंकाच दुःख देणारी आहे. आता जिथे हॉटेल पाहिले, तिथे खाल्ले, यात मग पुरुषही असे करतात आणि स्त्रिया सुद्धा हेच करतात.
पुरुष पण स्त्रियांना धडा शिकवतात आणि स्त्रिया पण पुरुषांना धडा शिकवतात! पण तरी यात स्त्रिया जिंकतात. कारण या पुरुषांमध्ये कपट नसते ना! त्यामुळे पुरुष स्त्रीकडून धोका खात असतो!
अर्थात जोपर्यंत 'सिन्सियारिटी-मोरालिटी' (सदाचार) होते तोपर्यंत संसारसुख घेण्यासारखे होते. आता तर भयंकर धोकेबाजी आहे. या प्रत्येकाला जर मी त्यांच्या बायकोविषयी सांगितले तर कोणीही स्वतःच्या बायको जवळ जाणार नाही. मला सर्वांचेच माहित असते पण मी काही सांगत-करत नाही, कारण की पुरुषही धोका देण्यात काही कमी नाही. परंतु स्त्री तर फक्त कपटचाच कारखाना! कपटचे संग्रहस्थान, दुसरे कुठेच नसते फक्त स्त्रीमध्येच असते.