________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
'ही स्त्री आहे' असे पाहतो. तर ते पुरुषाच्या आत रोग असेल तरच त्याला स्त्री दिसेल, नाहीतर आत्माच दिसेल आणि 'हा पुरुष आहे' असे पाहते, तो त्या स्त्रीचा रोग आहे. निरोगी झालात तर मोक्ष होईल. आता माझी निरोगी अवस्था आहे. म्हणून मला असा विचारच येत नाही. ___स्त्री-पुरुषांनी एकमेकांना स्पर्श करु नये, यात खूप जोखिम आहे. जोपर्यंत पूर्ण झालो नाही तोपर्यंत स्पर्श करु शकत नाही. नाहीतर विषयाचा एक जरी परमाणू घुसला तर कितीतरी जन्म बिघडवून टाकतो. आमच्यात तर विषयाचा परमाणूच नसतो. एकही परमाणू बिघडला तर लगेचच प्रतिक्रमण करावे लागते. प्रतिक्रमण केले तर समोरच्या व्यक्तिला (विषयाचा) भाव उत्पन्न होत नाही.
एक तर स्वत:च्या स्वरुपाचे अज्ञान आणि वर्तमानकाळाचे ज्ञान त्यामुळे त्याला राग (मोह, आशक्ति) उत्पन्न होतो. परंतु जर त्याला असे समजले की ती गर्भात होती तेव्हा अशी दिसत होती, जन्मली तेव्हा अशी दिसत होती, लहान होती तेव्हा अशी दिसत होती, मग अशी दिसत होती. आता अशी दिसत आहे, नंतर अशी दिसेल, म्हातारी होईल तेव्हा अशी दिसेल, पक्षाघात होईल तेव्हा अशी दिसेल, प्रेतयात्रा निघेल तेव्हा अशी दिसेल, अशा सर्व अवस्था ज्याच्या लक्षात आहे, त्याला वैराग्य शिकवावे लागत नसते! हे तर जे आज दिसत आहे ते पाहूनच मूर्छित होत असतात.
__ [3] विषय सुखात दावे अनंत या चार इन्द्रियांचे विषय काही त्रास देत नाहीत, परंतु हा जो पाचवा विषय आहे, स्पर्श विषय आहे तो तर समोरच्या जिवंत व्यक्तिसोबत
आहे! ती व्यक्ति दावा मांडेल अशी आहे, म्हणून फक्त या एका स्त्री विषयात हरकत आहे. ही तर जिवंत 'फाईल' म्हटली जाते आपण म्हटले की आता मला विषय बंद करायचा आहे, तेव्हा ती व्यक्ति म्हणेल की असे चालणार नाही. मग लग्नच कशाला केले? अर्थात ती जिवंत ‘फाईल' तर दावा मांडेल आणि दावा मांडलेला कसा परवडेल? अर्थात जिवंत व्यक्तिसोबत विषय-संबंध करुच नये.