________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
बोलत असे, परंतु लोभ संबंधीत गोष्ट आली तर तेव्हा मात्र काहीच बोलत नसत. एका विचक्षण श्रोत्याच्या लक्षात हे आले की हे महाराज कधी लोभाची गोष्ट का करत नाहीत? सर्वकाही बोलतात, विषयाच्या बाबतीतही बोलतात. म्हणून मग तो महाराजांकडे गेला आणि एकांतात त्यांचे गाठोडे उघडून बघितले. तर त्यातील एका पुस्तकाच्या आत सोन्याचे नाणे ठेवलेले होते, त्याने ते नाणे काढून घेतले आणि निघून गेला. नंतर महाराजाने जेव्हा गाठोडे उघडून पाहिले तर ते नाणे काही मिळे ना. नाण्याला खूप शोधले पण ते काही सापडले नाही. दुसऱ्या दिवसापासून महाराजांनी लोभाविषयी सांगण्यास सुरुवात केली की लोभ करु नये.
आता तुम्ही जर विषयाच्या बाबतीत बोलू लागले तर तुमची ती लाईन असेल तरीही ती तुटून जाईल कारण तुम्ही मनाच्या विरोधात आहात. मनाचे वोटिंग (मत) वेगळे आणि तुमचे वोटिंग वेगळे झाले. तेव्हा मन समजून जाते की 'हे तर आपल्या विरोधी होऊन गेले, आता आपले वोट चालणार नाही.' पण आत कपट आहे म्हणून लोक बोलत नाहीत, आणि असे बोलणे हे काही सोपे सुद्धा नाही ना! ।
प्रश्नकर्ता : पुष्कळ लोक असे समजतात की अक्रममध्ये ब्रह्मचर्याला काही महत्वच नाही. ते तर डिस्चार्जच आहे ना!
दादाश्री : 'अक्रमचा' असा अर्थ होतच नाही. असा अर्थ करणारा 'अक्रम मार्गाला' समजूच शकला नाही. जर तो खरोखर समजला असेल तर मला विषयासंबंधी त्याला पुन्हा सांगण्याची गरजच नसते. अक्रम मार्ग म्हणजे काय, तर डिस्चार्जलाच डिस्चार्ज समजले जाते. पण ह्या लोकांचे डिस्चार्जच नाही. त्यांच्यात तर अजून लालच आहे आत! हे सर्व तर अजून राजीखुशीने करत असतात. डिस्चार्जला कोणी समजू शकले आहे का?
[5] संसारवृक्षाचे मूळ, विषय या दुनियेचा संपूर्ण आधार पाच विषयांवरच आहे. ज्याला विषय नाही, त्याला संघर्ष नाही.