________________
94
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
स्त्रियांसाठीच आक्रमला आ
आहे. ह्या पाच इन्द्रियांच्या विषयातून आत्म्याने कधीही काहीही भोगलेच नाही. तरीही लोकं म्हणतात की माझ्या आत्म्याने विषय भोगले!!! अरे,
आत्मा भोगत असेल का? म्हणूनच कृष्ण भगवतांनी म्हटले की, 'विषय विषयात वर्ततात.' असे म्हटले तरी लोकांना ते समजले नाही. आणि हा तर म्हणतो, 'मीच भोगत आहे.' नाहीतर लोकं तर असे म्हणतील की, विषय विषयात वर्तत असतात, आत्मा तर सूक्ष्म आहे. म्हणून भोगा! असा त्याचाही दुरुपयोग करुन टाकणार.
[7] आकर्षण-विकर्षणाचा सिद्धांत ___ हे सर्व आकर्षणामुळेच टिकून राहिले आहे! लहान मोठ्या आकर्षणामुळे हे संपूर्ण जग उभे राहिले आहे. यात भगवंताला काही करण्याची गरज पडली नाही, फक्त आकर्षणच आहे! हे स्त्री-पुरुषाचे जे आहे ना, तेही फक्त आकर्षणच आहे. टाचणी आणि लोहचुंबकाचे जसे आकर्षण आहे तसेच हे स्त्री-पुरुषांचे आकर्षण आहे. सर्वच स्त्रियांसाठी आकर्षण होत नसते. परमाणू जुळत असतील त्या स्त्रियांसाठीच आकर्षण होत असते. आकर्षण झाल्यानंतर स्वतः नक्की केले असेल की मला आकर्षण होऊ द्यायचे नाही तरीही आकर्षण होते.
प्रश्नकर्ता : हे पूर्वीचे ऋणानुबंध झाले ना?
दादाश्री : ऋणानुबंध म्हटले, तर संपूर्ण जग हे ऋणानुबंध आहे. पण आकर्षण होणे ही गोष्ट तर अशी आहे की त्यांच्या परमाणूंचा एकमेकांशी हिशोब आहेत, म्हणून ओढले जातात! आता जो राग (मोह) उत्पन्न होत असतो, तो खरोखर राग नाही. हे जे लोहचुंबक आणि टाचणी आहे, ते लोहचुंबक जर फिरवले तर त्यानुसार टाचणी मागे पुढे होत असते. त्या दोघांमध्ये जीव तर नाही. तरीही लोहचुंबकाच्या गुणामुळे दोघांमध्ये आकर्षण होत असते. त्याच प्रमाणे ह्या देहाशी मिळतेजुळते परमाणू ज्याचे असतील त्याच्यासाठीच त्याला आकर्षण होते. त्यात लोहचुंबक आहे, आणि यात (देहात) इलेक्ट्रिकल बॉडी (तेजस-शरीर) आहे! पण जसे लोहचुंबक लोखंडाला ओढते, दुसऱ्या कोणत्या धातुला ओढत नाही.