________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
93
प्रश्नकर्ता : विषय आणि कषाय, या दोघांत मुलभूत फरक काय आहे?
दादाश्री : कषाय हे पुढील जन्माचे कारण आहे आणि विषय हे मागील जन्माचा परिणाम आहे, अर्थात ह्या दोघांत तर खूपच फरक आहे.
प्रश्नकर्ता : हे जरा सविस्तर समजवा.
दादाश्री : हे जितके सर्व विषय आहेत. ते मागील जन्मांचे परिणाम आहेत. म्हणून आम्ही रागवत नाही की तुम्हाला मोक्ष हवा असेल तर जा एकटे पडून राहा, घरातून बाहेर हाकलवले नसते का तुम्हाला? परंतु आम्ही आमच्या ज्ञानात पाहिले आहे की, विषय हे मागील जन्माचा परिणाम आहे, म्हणून म्हटले की जा, घरी जाऊन आरामशीर झोपा, निवांतपणे फाईलींचा निकाल करा. आम्ही पुढील जन्माची कारणे तोडून टाकतो परंतु जे मागील जन्माचे परिणाम आहेत त्यांना आम्ही छेदू शकत नाही, कोणाकडूनही ती छेदली जाऊ शकत नाही. महावीर भगवानांकडूनही छेदली जाऊ शकत नाही. कारण की भगवानांना सुद्धा तीस वर्षांपर्यंत संसारात राहावे लागले होते आणि मुलगीही झाली होती. विषय आणि कषायाचा खरा अर्थ हा होतो. पण लोकांना हे माहितच नसते ना! हे तर फक्त भगवान महावीर एकटेच जाणतात की याचा अर्थ काय होतो.
प्रश्नकर्ता : पण विषय आले, तर कषाय उत्पन्न होतात ना?
दादाश्री : नाही. सगळे विषय हे विषयच आहेत, पण विषयात अज्ञानता असेल तर कषाय उत्पन्न होतात आणि ज्ञान असेल तर कषाय उत्पन्न होत नाहीत. कषायांचा जन्म कुठून झाला? तर म्हणे, विषयांमधून. अर्थात हे जे सर्व कषाय उत्पन्न झालेले आहेत ते सर्व विषयातून उत्पन्न झालेले आहेत. परंतु यात विषयाचा दोष नाही, अज्ञानतेचा दोष आहे. मूळ कारण काय आहे? तर अज्ञानता.
[6] आत्मा अकर्ता-अभोक्ता विषयाचा स्वभाव वेगळा आहे आणि आत्म्याचा स्वभाव वेगळा