________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
_हे तर इलेक्ट्रिसिटीमुळे परमाणू प्रभावित होतात आणि त्यामुळे परमाणू ओढले जातात. जसे टाचणी आणि लोहचुंबक यांच्यामध्ये कोणी येते का? टाचणीला आपण शिकवले होते का, की तू खाली वर हो म्हणून?
अर्थात हे देह तर संपूर्ण विज्ञान आहे, विज्ञानाने हे सर्व चालत असते. आकर्षण होते त्यास लोक म्हणतात की मला राग झाला. अरे, आत्म्याला राग होत असेल का? आत्मा तर वीतराग आहे! आत्म्याला रागही नसतो आणि द्वेषही नसतो. हे दोन्ही स्व-कल्पित आहेत. ही भ्रांति आहे. भ्रांति निघून गेली तर दूसरे काहीच नाही.
प्रश्नकर्ता : आकर्षणाचे प्रतिक्रमण करावे लागते का?
दादाश्री : हो नक्कीच! आकर्षण-विकर्षण या शरीराला होत असेल तर आपल्याला चंदुभाऊला सांगावे लागते की, 'हे चंदुभाऊ, (फाईल नं.१) इथे आकर्षण होत आहे म्हणून प्रतिक्रमण करा, तर मग आकर्षण बंद होऊन जाते. आकर्षण आणि विकर्षण दोन्ही गोष्ट आपल्याला भटकवणाऱ्या आहेत.
[8] वैज्ञानिक गाईड ब्रह्मचर्यासाठी असे पुस्तक हिंदुस्तानात निघालेच नाही, हिंदुस्तानात कितीही शोधले तरी असे ब्रह्मचर्याचे पुस्तक मिळणार नाही. कारण की जे खरे ब्रह्मचारी होते ते सांगण्यासाठी राहिले नाहीत. अणि जे ब्रह्मचारी नाहीत, ते सांगण्यासाठी राहिले परंतु त्यांनी काही लिहीलेले नाही. जे ब्रह्मचारी नाहीत ते कसे लिहू शकतील? स्वत:मध्ये जे दोष असतात, त्यावर विवेचन लिहिणे संभव नाही. तात्पर्य जे खरे ब्रह्मचारी होते ते सांगण्यासाठी राहिले नाहीत. जे खरे ब्रह्मचारी होते ते चोवीस तीर्थंकर! कृपाळुदेवांनीही यावर थोडे फार सांगितले आहे.
__ हे आपले ब्रह्मचर्याचे पुस्तक ज्याने वाचले असेल तोच ब्रह्मचर्य पाळू शकेल. नाहीतर ब्रह्मचर्य पाळणे हे काय सोपे आहे ?