________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
दोन मन एकाकार होऊच शकत नाहीत. म्हणून मग दावेच चालतात. हा विषय सोडून बाकी सर्व विषयांत एक मन आहे, एकपक्ष आहे. त्यामुळे समोरचा दावा मांडत नाही !
प्रश्नकर्ता : विषय रागाने भोगले जाते की द्वेषाने ?
दादाश्री : रागाने. परंतु या रागामधुन द्वेष उत्पन्न होतो.
प्रश्नकर्ता: द्वेषाचे परिणाम उत्पन्न झाल्याने उलट जास्त कर्म बांधले जातात ना ?
91
दादाश्री : नुसते वैरच बांधत असतो, अर्थात ज्याला ज्ञान नसेल त्याला आवडत असेल तरीही कर्मबंधन होते आणि आवडत नसेल तरीही कर्मबंधन होते, आणि 'ज्ञान' असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचे कर्मबंधन होत नाही.
म्हणून जिथे-जिथे ज्या-ज्या व्यक्तिसाठी आपले मन आकर्षित होत असेल त्याच व्यक्तिच्या आत जो शुद्धात्मा आहे तोच आपल्याला ह्या आकर्षणातून सोडवणारा आहे. म्हणून त्या शुद्धात्म्याजवळच मागणी करावी की मला ह्या अब्रह्मचर्य विषयापासून मुक्त करा. इतर सर्व ठिकाणी यातून सुटण्याचे प्रयत्न केले तर ते व्यर्थ आहे. त्याच व्यक्तिचा शुद्धात्मा आपल्याला ह्या विषयातून सोडवणारा आहे.
विषय हे आसक्तीने उत्पन्न होत असतात, नंतर त्यातून विकर्षण उत्पन्न होत असते. विकर्षण झाले की वैर बांधले जाते आणि वैराच्या ‘फाउन्डेशन' (पायावर) वर हे जग उभे राहिले आहे.
असे आहे ना की, या अवलंबनाचे आपण जितके सुख घेतले आहे ते सर्व उसने घेतलेले सुख आहे, 'लोन' वर घेतले आहे आणि 'लोन' म्हणजे 'रिपे' करावे (फेडावे) लागते. लोन फेडले गेले की मग कसलीच झंझट उरत नाही.
[4] विषयभोग नाही निकाली
एक साधु महाराज होते, ते व्याख्यानात विषय संबंधीत खूप सारे