________________
88
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
यात अभिप्राय वर्तत आहे आणि या अभिप्रायमुळे 'जसे आहे तसे' आरपार पाहू शकत नाही, मुक्त आनंदाचा अनुभव करु शकत नाही, कारण की यात अभिप्रायाचे आवरण अडचणरुप बनते. अभिप्राय तर ब्रह्मचर्याचाच ठेवला पाहिजे. व्रत कशास म्हणतात? तर (आपल्या आपणच) वर्तत असते त्यास व्रत म्हणतात. ब्रह्मचर्य महाव्रत कशास म्हणतात? की ज्याला अब्रह्मचर्याची आठवणच येत नाही, त्याला ब्रह्मचर्य महाव्रत वर्तनात आहे असे म्हणतात.
[10] आलोचनेनेच टळतात, जोखिम व्रतभंगाचे
भगवंताने काय म्हटले आहे की तू स्वत:हून व्रत तोडले तर तुटेल. अन्य कोणी कसे तोडवू शकेल? असे कुणाच्या तोडल्याने व्रत तुटत नसते. व्रत घेतल्यानंतर व्रताचा भंग झाला तर आत्मा (आत्मज्ञान) सुद्धा निघून जातो. व्रत घेतले असेल तर त्याचा भंग आपल्याकडून होता कामा नये. आणि भंग झालाच तर स्पष्ट सांगून द्यावे की आता माझ्या ताब्यात राहिले नाही.
_ [11] चारित्र्याचा प्रभाव! व्यवहार चारित्र्य अर्थात पुद्गल चारित्र्य, डोळ्यांनी दिसेल असे चारित्र्य आणि दुसरे निश्चय चारित्र्य उत्पन्न झाले म्हणजे देव झाला असे म्हटले जाईल. सध्या तर तुम्हां सर्वांना 'दर्शन' आहे, नंतर ते ज्ञानात येईल, परंतु चारित्र्य उत्पन्न होण्यास तर अजून वेळ लागेल. पण तरीही हे अक्रम असल्या कारणाने चारित्र्यही सुरु होते, परंतु ते तुम्हाला समजणे कठीण आहे.
प्रश्नकर्ता : व्यवहार चारित्र्यासाठी दुसरे विशेष काय करावे?
दादाश्री : काही नाही. ह्या व्यवहार चारित्र्यासाठी तर आणखी काय करावे? तर ज्ञानींच्या आज्ञेत रहावे हेच व्यवहार चारित्र्य आणि त्यात जर कधी ब्रह्मचर्यही पाळले गेले तर अति उत्तम आणि तेव्हाच खरे चारित्र्य म्हटले जाईल.
जग जिंकण्यासाठी एकच चावी सांगतो की विषय जर विषयरुप