________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
87
कित्येक लोक असे म्हणतात की, माझ्याने विषय सुटत नाही. मी म्हटले, असा वेडापणा का करतोस? थोडे तरी नियम घे ना! त्या नियमात रहा, मग ते नियम सोडू नकोस. ह्या काळात नियम न करुन तर चालणारच नाही! थोडी सूट तर ठेवावी लागते. नाही ठेवावी लागत?
प्रश्नकर्ता : जर पुरुषाची इच्छा ब्रह्मचर्य पाळण्याची असेल आणि स्त्रीची इच्छा नसेल तर काय करावे?
दादाश्री : नसेल तर त्यात काय हरकत आहे? तिला समजावायचे. प्रश्नकर्ता : कसे समजावायचे?
दादाश्री : हे तर असे समजावता समजावता एक दिवस ती ऐकेल, हळूहळू ! एकदम बंद नाही होणार. दोघांनीही आपसात समाधानपूर्वक मार्ग निवडा ना! यात काय नुकसान आहे, ते सर्व सांगायचे आणि यावर मंथन करायचे.
__मोक्ष पाहिजे असेल तर विषय काढावा लागेल. जवळपास हजार महात्मा आहेत की जे वर्षभरासाठी ब्रह्मचर्यव्रत घेतात. 'मला एका वर्षासाठी व्रत दया' असे म्हणतात. एका वर्षात त्यांच्या लक्षात येते.
अब्रह्मचर्य हे अनिश्चय आहे. अनिश्चय हे उदयाधीन नाही.
मी तर चार-पाच जणांना विचारले तर चकीत झालो. मी म्हटले, भाऊ, अशी पोल (बहाणे, अप्रामाणिकता) चालणार नाही, हा तर अनिश्चय आहे. त्यास तर काढावेच लागेल. ब्रह्मचर्य तर पहिले पाहिजे. तसे निश्चयाने तर तुम्ही ब्रह्मचारीच आहात परंतु व्यवहाराने सुद्धा व्हावे लागेल ना.
ब्रह्मचर्य आणि अब्रह्मचर्याचा ज्याला अभिप्राय नाही, त्याला ब्रह्मचर्य व्रत वर्तनात आले असे म्हटले जाईल. निरंतर आत्म्यात राहणे, हे आमचे ब्रह्मचर्य आहे. तरीही आम्ही या बाहेरील ब्रह्मचर्याचा स्वीकार करीत नाही असे नाही. तुम्ही संसारी आहात म्हणून मला सांगावे लागते की अब्रह्मचर्यास हरकत नाही, परंतु अब्रह्मचर्याचा अभिप्राय तर असायला नकोच. अब्रह्मचर्य तर आपल्यासाठी निकाली फाईल आहे. पण अजुनही