________________
86
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
अब्रह्मचर्य आणि दारु, ह्या दोन्ही ज्ञानात खूप आवरण आणणाऱ्या वस्तु आहेत. म्हणून यात खूपच जागृत राहावे. दारुमुळे तर, 'मी चंदुभाऊ आहे' याचे सुद्धा भान राहत नाही ना! मग आत्मा तर विसरुनच जाऊ ना! म्हणूनच भगवंताने (विषयापासून) घाबरण्यास सांगितले आहे. ज्याला संपूर्ण अनुभव ज्ञान झाले असेल, त्याला स्पर्शत नाही, पण तरीही भगवंताच्या ज्ञानाला देखील उपटून फेकून देते! इतके भयंकर यात जोखिम आहे!
__ ज्याला परिपूर्ण व्हायचे असेल, त्याला तर विषय असायलाच नको. पण तरी तसा काही नियम नाही. त्यासाठी तर शेवटच्या जन्मात शेवटची पंधरा वर्षे विषय सूटला तरी बस झाले. त्यासाठी जन्मोजन्म व्यायाम करण्याची गरज नाही किंवा त्यागी होण्याचीही आवश्यकता नाही. त्याग तर सहज असायला हवा की ते आपोआपच सुटून जाईल! निश्चयभाव तर असाच असावा की मोक्षात जाईपर्यंत जे काही दोन-चार जन्म होतील, ते लग्नाशिवायचे व्यतीत झाले तर उत्तम. यासारखे दुसरे काहीच नाही.
___ आता हे आत्म्याचे स्पष्टवेदन कुठपर्यंत होत नाही? जोपर्यंत हे विषय विकार जात नाहीत तोपर्यंत स्पष्टवेदन होत नाही. अर्थात हे नक्की आत्म्याचे सुख आहे की दुसरे कोणते सुख आहे, ते 'एक्जेक्ट' (यथार्थ) समजत नाही. ब्रह्मचर्य असेल तर 'ऑन दि मोमेन्ट' (त्याच क्षणी) समजते. स्पष्टवेदन झाले म्हणजे तो परमात्माच होऊन गेला असे म्हटले जाते!
[9] घ्या व्रताचे ट्रायल! आम्ही तुम्हाला वेळोवेळी सावध करीत असतो. पण सावधान होणे हे काही सोपे नाही ना! पण तरीही जर असा प्रयोग केला की माहिन्यात तीन दिवस किंवा पाच दिवस आणि जर पूर्ण आठवडाभर (विषयात संयम) केला तर खूपच छान. स्वतःच्याही लक्षात येईल. आठवड्याच्या मधल्या दिवशी तर इतका आनंद होईल! आत्म्याचे सुख आणि आस्वाद येईल की यात किती सुख आहे! याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल!