________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
85
आहे ? लोकसंख्या कमी करण्यासाठीच तर ऑपरेशन करतात पण तरीही कमी होत नाही ना! ब्रह्मचर्य तर (मोक्षमार्गात) मोठे साधन आहे.
प्रश्नकर्ता : ही जे नेचरल प्रोसेस (नैसर्गिक प्रक्रीया) आहे, त्या वर आपण तिरस्कार करीत आहोत असे नाही का म्हटले जाणार? ।
दादाश्री : ही काही नेचरल प्रोसेस नाही, ही तर पाशवता आहे. माणसात. जर नेचरल प्रोसेस असती तर ब्रह्मचर्य पाळायचे, असे राहीलेच नसते ना! ही जनावरे ब्रह्मचर्य पाळतात बिचारी, सिजन(ऋतु) पुरताच पंधरा-वीस दिवस विषय, नंतर काहीच नाही.
[8] ब्रह्मचर्याची किंमत, स्पष्ट वेदन-आत्मसुख
प्रश्नकर्ता : हे ज्ञान मिळाल्यानंतर, दादाश्रींचे ज्ञान मिळाल्यानंतर ब्रह्मचर्याची आवश्यकता आहे की नाही?
दादाश्री : जो ब्रह्मचर्य पाळू शकतो त्याच्यासाठी आवश्यकता आहे आणि जो ब्रह्मचर्य पाळू शकत नाही त्याच्यासाठी आवश्यकता नाही. जर आवश्यकता राहिली असती तर जे ब्रह्मचर्य पाळत नाहीत त्या माणसांना रात्रभर झोपच आली नसती, त्यांना वाटले असते की आता तर आपला मोक्ष चकेल. अब्रह्मचर्य हे चुकीचे आहे, असे समजून घेतले तरीही पुष्कळ झाले.
प्रश्नकर्ता : फिलोसॉफर (तत्वज्ञ) असे म्हणतात की, सेक्सला दाबून ठेवल्याने विकृती येते. सेक्स (विषयभोग) आरोग्यासाठी आवश्यक आहे.
दादाश्री : त्यांची गोष्ट बरोबर आहे, परंतु अज्ञानींना सेक्सची गरज आहे. नाहीतर शरीरावर आघात होईल. जे ब्रह्मचर्याला समजतात, त्यांना सेक्सची गरज नाही, आणि अज्ञानी माणसाला जर यावर बंधन आणले, तर त्याचे शरीर तुटेल, संपून जाईल.
हा विषय अशी वस्तु आहे की, एकाच दिवसाचा विषय तीन दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारची एकाग्रता होऊ देत नाही. एकाग्रता डगमगते. जेव्हा की महिन्याभर विषयाचे सेवन केले नाही, तर त्या व्यक्तिची एकाग्रता डगमगत नाही.