________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
83
फक्त बायको सोबतच नव्हे, तर साऱ्या जगासोबतची भांडणे बंद होऊन जातात. हे विज्ञानच असे आहे, आणि भांडणे बंद झाली म्हणजे सुटलो.
विषयात घृणा उत्पन्न झाली तरच विषय बंद होतो. नाहीतर विषय कसा बंद होईल?
[7] विषय ही पाशवता! आमच्या वेळी प्रजा एका बाबतीत खूप चांगली होती. विषय विचार नव्हते. कोणत्याही स्त्रीकडे कुदृष्टी नाही. तसे असतात, शेकडा पाच, सात टक्के तसे असतातही. ते फक्त विधवांनाच शोधून काढायचे. दूसरे काही नाही. ज्या घरात कोणी (पुरुष) राहत नसेल तिथे. विधवा म्हणजे पती शिवायचे घर, असे म्हणतात. आम्ही चौदा पंधरा वर्षाचे झालो, तोपर्यंत मुलींना आम्ही बहीण म्हणायचो, खूप दूरचा नातेसंबंध असला तरीही. ते वातावरणच असे असायचे. कारण की लहानपणी दहा अकरा वर्षाचे होई पर्यंत तर दिगंबरी अवस्थेत फिरायचो!
विषयाचा विचारच येत नसे. म्हणून झंझटच नव्हती ना. विषयविकाराची जागृतीच नाही.
प्रश्नकर्ता : समाजाचे एक प्रकारचे प्रेशर (दबाव) होते, म्हणून?
दादाश्री : नाही, समाजाचे प्रेशर नाही. आई वडीलांचे वर्तन, संस्कार ! तीन वर्षाच्या मुलाला हे माहित नसे की माझ्या आई वडीलांचा असा काही संबंध आहे. इतकी सुंदर सिक्रसी(गुप्तता) असे! आणि असे असायचे, त्या दिवशी मुले दुसऱ्या खोलीत झोपत असत. असे आई वडीलांचे संस्कार असायचे. आता तर ठिकठिकाणी बेडरुम. पुन्हा डबलबेड असतो ना?
त्या काळात कोणताही पुरुष स्त्री (पत्नी) सोबत एका अंथरुणात झोपत नसे. त्यावेळी अशी म्हण होती की जो पुरुष रात्रभर स्त्रीसोबत झोपेल तो स्त्री होऊन जातो, तिचे पर्याय स्पर्श करतात. म्हणून कोणी असे करत नसे. हे तर कोणी अक्कलवाल्याने शोधून काढले. म्हणून डबल बेडची विक्री होऊ लागली! म्हणूनच प्रजा डाऊन झाली (खाली