________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
चालू आहे. लग्न झाले तेव्हापासूनच एका बाजूने भांडणही चालू आहे आणि एका बाजूने विषयही चालू आहे ! म्हणून तर आम्ही सांगितले की तुम्ही दोघांनी ब्रह्मचर्य व्रत घ्या, मग जीवन उत्तम होईल. तात्पर्य, हे भांडणतंटे स्वतःच्या गरजेमुळे करतात. तिला माहित आहे की शेवटी तो कुठे जाणार?! आणि त्यालाही माहित आहे की ही तरी कुठे जाणार आहे? अशा प्रकारे समोरासमोर गरजेने टिकून राहिले आहे.
विषयात सुखापेक्षा विषयाच्या परवशतेचे दुःख जास्त आहे ! असे जेव्हा समजते तेव्हा मग विषयाचा मोह सुटतो आणि तेव्हाच स्त्री जातीवर (बायकोवर) प्रभाव पाडू शकतो. आणि त्यानंतर हा प्रभाव निरंतर प्रतापात रुपांतर होतो. नाहीतर ह्या जगात मोठमोठ्या महान पुरुषांनी पण स्त्री जातीपासून मार खाल्ला होता. वीतरागच या गोष्टीला समजू शकले! म्हणून त्यांच्या प्रतापामुळेच स्त्रिया दूर राहत होत्या! नाहीतर स्त्री जात तर अशी आहे की वाटेल त्या पुरुषाला चुटकीसरशी लट्ट बनवून टाकते, तिच्याजवळ अशी शक्ति आहे. यालाच स्त्री चारित्र्य म्हटले आहे ना! स्त्री संगापासून तर दूरच राहावे. तिला कोणत्याही प्रकारे जाळ्यात ओढू नये, नाहीतर तुम्ही स्वतःच तिच्या जाळ्यात अडकाल. आणि तीच-तीच झंझट कित्येक जन्मांपासून होत आली आहे ना!
स्त्रिया पतीला दबावात ठेवतात, याचे काय कारण असेल? पुरुष खूप विषयी असतो, म्हणून दबावात ठेवतात. ह्या स्त्रिया खायला घालतात त्यामुळे दबावात ठेवत नाहीत, तर विषयाने दबावात ठेवतात! जर पुरुष विषयी नसेल तर कोणतीही स्त्री त्याला दबावात ठेवू शकत नाही! कमजोरीचाच फायदा घेते. पण जर कमजोरी नसेल तर काहीच करु शकत नाही. स्त्री जाती खूप कपटी आहे आणि आपण पुरुष भोळे ! म्हणून तुम्ही दोन-दोन, चार-चार महिन्याचा (विषयात) कंट्रोल (संयम) ठेवला पाहिजे, मग ती स्वतःहून थकून जाते. तेव्हा मग तिला कंट्रोल रहात नाही.
स्त्री वश केव्हा होते? जर आपण विषयात खूप सेन्सिटिव (संवेदनशील) असलो तर ती आपल्याला वश करुन टाकते! पण आपण