________________
84
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
घसरली). डाऊन होण्यात फायदा काय झाला? तर त्यावेळीचे जे तिरस्कार होते ते सर्व निघून गेले. म्हणून आता डाऊन झालेल्यांना वर चढवण्यात वेळ लागणार नाही. ___अरे! असे डबल बेड आपल्या हिंदुस्तानात असू शकतात का? कसली जनावरा सारखी माणसं आहेत? हिंदुस्तानचे स्त्री-पुरुष कधीही एका खोलीत नसायचेच. नेहमी वेगळ्या खोलीतच असत. आणि आज हे बघा तरी! आजकालचे तर आई-बापच बेडरुम तयार करुन देतात, डबल बेड! म्हणूनच ही मुले समजून गेली की, या दुनियेत अशीच प्रथा चालत आली आहे. हे सर्व आम्ही पाहिले आहे.
ह्या स्त्रियांची संगत जर मनुष्याने फक्त पंधरा दिवसांसाठी जरी सोडली, पंधरा दिवस दूर राहिला, तर तो देवासारखा होऊन जाईल!
एकांत शैयासन म्हणजे काय? तर शैयेतही कोणी सोबत नाही आणि आसनातही कोणी सोबत नाही. संयोगी ‘फाईलचा' कोणत्याही प्रकारचा स्पर्श नाही. शास्त्रकार तर इथपर्यंत मानत होते की, ज्या आसनावर परजाती बसली, त्या आसनावर तू बसशील तर तुला तिचा स्पर्श होईल, विचार येतील.
__ प्रश्नकर्ता : विषय दोषाने जे कर्मबंधन होते, ते कशा स्वरुपाचे असते?
दादाश्री : जनावराच्या स्वरुपाचे. विषय पदच जनावर पद आहे. पूर्वी हिंदुस्तानात निर्विषयी-विषय होता. म्हणजे फक्त एका पुत्रदाना पुरताच विषय होता.
प्रश्नकर्ता : दादाजी ब्रह्मचर्यावर अधिक जोर देतात आणि अब्रह्मचर्यासाठी तिरस्कार दाखवतात. पण असे केल्याने तर सृष्टी वरील मानवांची संख्याही कमी होईल. तर या बाबतीत आपले काय मत आहे?
दादाश्री : इतके सर्व (कुटुंब नियोजनाचे) ऑपरेशन केले तरीही लोकसंख्या कमी होत नाही, मग ब्रह्मचर्य पाळल्याने काय कमी होणार