________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
जरी विषयी असलो पण त्यात जर सेन्सिटिव होत नसू तर ती आपल्या वश होते! जर ती 'जेवणासाठी' बोलावेल आणि तुम्ही सांगितले की आता नाही, दोन-तीन दिवसानंतर, तर मग ती तुम्हाला वश होईल! अन्यथा तुम्ही तिला वश व्हाल! ही गोष्ट मी पंधरा वर्षाचा असताना समजून गेलो होतो. कित्येक पुरुष तर विषयाची भीक मागतात की 'आजचा दिवस!' अरे, अशी विषयाची भीक मागतात का? मग तुझी काय अवस्था होईल? स्त्री काय करते? डोक्यावर चढून बसेल! सिनेमा पाहायला गेले तर म्हणेल, 'मुलाला उचलून घ्या. 'आपल्या महात्म्यांना विषय असतो पण विषयाची भीक नसते!
___ एक स्त्री आपल्या नवऱ्याला चार वेळा साष्टांग नमस्कार करायला लावते, तेव्हा कुठे एक वेळा स्पर्श करु देते, अरे मूर्खा ! यापेक्षा समाधि घेतली असती तर काय वाईट झाले असते?! समुद्रात समाधि घे, समुद्र तरी सरळ आहे, दुसरी झंझट तर नाही! विषयासाठी चार वेळा साष्टांग!
प्रश्नकर्ता : आधी आम्ही असे समजत होतो की, घरच्या कामकाजामुळे भांडण होत असेल. म्हणून घरातील कामकाजात मदत करु लागलो तरीही भांडणच.
दादाश्री : अशी सर्व भांडणे होतच राहणार. जोपर्यंत विकारी गोष्टी आहेत, संबंध आहे तोपर्यंत संघर्ष होतच राहाणार. संघर्षाचे मूळच हे आहे. ज्याने विषयावर विजय प्राप्त केला, त्याला कोणीही हरवू शकत नाही, कोणी त्याचे नाव सुद्धा घेऊ शकत नाही. त्याचा प्रभाव पडतो.
जेव्हापासून हिराबा (दादाश्रींची धर्मपत्नी) सोबत माझा विषय बंद झाला तेव्हापासून मी त्यांना 'हिराबा' म्हणू लागलो. त्यानंतर आम्हाला खास काही अडचण आली नाही. त्याआधी विषय संबंधामुळे थोडा फार संघर्ष होत असे. परंतु जोपर्यंत विषयांचा डंख आहे, तोपर्यंत संघर्ष जात नाही. त्या डंखापासून जेव्हा मुक्त होतो तेव्हा (संघर्ष) जातो. आमचा स्वत:चा अनुभव सांगत आहोत.
विज्ञान तर बघा! जगा सोबतची भांडणेच बंद होऊन जातात.