________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
ही लोकं तर बायकोला यायला जरा उशीर झाला तरी शंका घेतात. शंका घेण्यासारखे नाही. ऋणानुबंधाच्या बाहेर काहीच होणार नाही. ती घरी आल्यानंतर तिला समजवायचे. परंतु शंका करु नये. शंकेमुळे तर उलट अधिक बिघडेल. हो, चेतावणी जरुर द्या. पण शंका करु नका. शंका करणारा मोक्ष गमावून बसतो.
80
अर्थात आपल्याला जर सुटायचे असेल, मोक्षाला जायचे असेल तर आपण शंका करु नये. कोणी परका माणूस तुमच्या बायकोच्या गळ्यात हात टाकून फिरत असेल आणि हे जर तुमच्या पाहण्यात आले, तर काय आपण विष प्यायचे !
प्रश्नकर्ता : नाही, असे कशासाठी करणार !
दादाश्री : तर मग काय करायचे ?
प्रश्नकर्ता : थोडे नाटक करावे लागते, मग समजुत काढावी, त्यानंतर ती जे करेल ते 'व्यवस्थित. '
दादाश्री : हो बरोबर आहे.
[6] विषय बंद, तिथे भांडणतंटे बंद
या जगात भांडणतंटा कुठे असतो ? जिथे आसक्ति असेल तिथेच. भांडण कुठपर्यंत होत राहतात ? विषय आहे तोपर्यंत ! मग 'माझे-तुझे ' करायला लागतात, ‘ही तुझी बॅग उचल इथून. माझ्या बॅगेत साड्या का ठेवल्या?' अशी भांडणे विषयात एक आहेत तोपर्यंत. आणि विषयातून सुटल्यानंतर आपल्या बॅगमध्ये ठेवले तरी हरकत नाही. मग भांडण होत नाही ? मग काहीच भांडण नाही ?
प्रश्नकर्ता : पण आपल्याला हे सर्व बघून कंप सुटतो. परत असेही वाटते की रोजचीच अशी भांडणे चालत राहतात, तरीही नवराबायकोला याचे समाधान करुन याचा अंत आणण्याची इच्छा होत नाही, हे आश्चर्यच आहे ना ?
दादाश्री : हे तर कित्येक वर्षांपासून, लग्न झाले तेव्हापासून असे