________________
78
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : परंतु जर मनात शंकेने पाहण्याची गाठ पडली असेल तर तिथे कोणती 'एडजस्टमेन्ट' घ्यावी?
दादाश्री : हे जे तुम्हाला दिसते की याचे चारित्र्य खराब आहे, तर काय पूर्वी नव्हते? हे काय अचानकच उत्पन्न झाले आहे? म्हणून समजुन घेण्यासारखे हे जग आहे, की हे तर असेच असते. या काळात कोणाचेही चारित्र्य पाहायचेच नाही. या काळात तर सगळीकडे असेच असते. बाहेरुन दिसत नाही पण मन तर बिघडतेच. आणि त्यात स्त्री चारित्र्य म्हणजे निव्वळ कपट आणि मोहाचे संग्रहस्थान, म्हणून तर स्त्रीचा जन्म मिळतो. यात सर्वात चांगले तर हेच की जे विषयापासून सुटले असतील.
प्रश्नकर्ता : चारित्र्यात तर असेच असते हे आम्ही जाणतो. तरीही मन शंका करते तेव्हा तन्मयाकार होऊन जातो. तिथे कशी 'एडजस्टमेन्ट' घ्यावी?
दादाश्री : आत्मा झाल्यानंतर दुसऱ्या कशात पडायचेच नाही. हे सर्व 'फोरेन डिपार्टमेन्ट'(अनात्म विभाग) चे आहे. आपण 'होम' मध्ये (आत्म्यात) राहावे. आत्म्यात राहा ना! असे 'ज्ञान' पुन्हा-पुन्हा मिळणे शक्य नाही, म्हणून (मोक्षाचे) काम काढून घ्या. एका माणसाला त्याच्या पत्नीवर शंका येत असे. मी त्याला विचारले की तुला शंका कशामुळे होते? तू पाहिले त्यामुळे शंका होते? मग तू जेव्हा पाहिले नव्हते तेव्हा तसे होत नव्हते का? आपले लोक तर जो पकडला जातो त्याला 'चोर' म्हणतात. पण जे पकडले गेले नाहीत ते सर्व आतून चोरच आहेत.
तुम्ही आत्मा आहात मग घाबरण्यासारखे राहिलेच कुठे? हे तर जे 'चार्ज' झालेले होते, त्याचेच 'डिस्चार्ज' आहे! जग स्पष्टरुपाने 'डिस्चार्जमय' आहे. 'डिस्चार्ज' च्या बाहेर हे जग नाहीच. म्हणूनच आम्ही सांगत असतो ना, 'डिस्चार्जमय' असल्यामुळे कोणीही अपराधी नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे यात सुद्धा कर्माचा सिद्धांत काम करतो ना? दादाश्री : हो. कर्माचा सिद्धांतच काम करत आहे, दूसरे काहीच