________________
76
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
भोगून मोकळे होतात. तिला भोगून घेतात. जसे की याच रस्त्याने भटकायचे असेल... हे तुला फारसे समजत नाही ना? थोडे-थोडे तरी?
प्रश्नकर्ता : समजतय, कम्प्लीट. पूर्वी तर पुरुषांची काही चूकच नाही अशा प्रकारे सत्संग चालत होते. पण आज ही गोष्ट निघाली तेव्हा समजले की, यात अशा प्रकारे पुरुषही खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतात.
दादाश्री : पुरुषच जबाबदार आहेत, स्त्रीला स्त्रीरुपात ठेवण्यात पुरुषच जबाबदार आहे.
पती नसेल, पती निघून गेला असेल, काहीही झाले तरीही दुसऱ्याजवळ जाणार नाही. मग तो वाटेल तसा असो, प्रत्यक्ष 'देव' जरी पुरुष होऊन आलेला असेल, पण नाही. 'मला माझा पती आहे, मी विवाहित आहे.' अशा स्त्रीला सती म्हणतात. सध्या सतीत्व म्हणता येईल असे आहे का ह्या लोकांचे? अशा स्त्रिया आहेत का? नेहमी असे नसते, नाही? काळ वेगळा आहे ना? सत्युगात असा टाईम येतो कधीतरी, स्त्रियांसाठीच. म्हणून तर सतीचे नामस्मरण करतात ना आपली लोकं!
सती होण्याचा इच्छेमुळे तिचे नाव घेतले असेल तर कधीतरी सती होईल. परंतु आज तर विषय बांगड्यांच्या भावात विकला जात आहे ? हे तुम्हाला माहित आहे ? नाही समजले, मी काय म्हणतो ते?
प्रश्नकर्ता : हो, बांगड्यांच्या भावात विकला जात आहे.
दादाश्री : कोणात्या बाजारात? कॉलेजात! कोणत्या भावाने विकले जाते? सोन्याच्या भावात बांगड्या विकल्या जातात. हिऱ्याच्या भावात बांगड्या विकल्या जातात! सगळीकडेच असे नसते. कित्येक स्त्री तर सोने दिले तरी घेणार नाही. वाटेल ते दिले तरीही घेणार नाही! परंतु दुसऱ्या एखाद्या विकल्या पण जातात, आजच्या स्त्रिया. सोन्याच्या किमतीत नाही, तर दुसऱ्या किमतीत, पण विकल्या जातात!
(एखादी स्त्री) पहिल्यापासून सती नसेल परंतु बिघडल्यानंतर