________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
75
केला तरीही सर्व पापं जळून जातात. इतर लोकांचे पाप सुद्धा जळून जाते, पण त्यांचे पूर्ण जळत नाही, आपण तर हे विज्ञान मिळाल्यानंतर, जर विषयावर खूप पश्चाताप करत राहिलो, तर यातून बाहेर निघू शकतो!
प्रश्नकर्ता : मागे जी गोष्ट सांगितली होती की, पुरुषाने (स्त्रीला) कपट करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. म्हणजे यात पुरुष मुख्य कारणरूप आहे. आमचा जो जीवन व्यवहार आहे आणि त्यांचे जे कपट आहे, त्यांची जी गाठ आहे, यात जर मी जबाबदार असेल तर यासाठी विधी करुन द्यावी की मी ते सर्व सोडू शकेन.
दादाश्री : हो, विधी करुन देऊ. त्यांचे कपट वाढले, त्यासाठी आपण पुरुष जबाबदार आहोत. बऱ्याच पुरुषांना या जबाबदारीचे भान खूप कमी असते. तो जरी सर्व प्रकारे माझी आज्ञा पाळत असेल, तरीही स्त्रीला भोगण्यासाठी पुरुष तिला काय समजावतो? तिला सांगेल की, आता यात तर काही हरकत नाही. म्हणून बिचाऱ्या स्त्रीकडून चूक घडते. तिला औषध प्यायचे नसते.. तिला प्यायचेच नसते. पण तरीही प्रकृति तर पिणारीच असते ना! प्रकृति त्यावेळी खुश होऊन जाते. पण हे उत्तेजन कोणी दिले? तर पुरुष यासाठी जबाबदार आहे.
या सर्व स्त्रिया ह्या कारणामुळेच स्लिप झाल्या आहेत. कोणी गोड बोलले की तिथे स्लिप होऊन जाते. ही खूप गुह्य गोष्ट आहे, समजेल अशी नाही.
अर्थात या विषयामुळे तो स्त्री झाला आहे. फक्त या एका विषयामुळेच. पुरुषांनी भोगण्यासाठी तिला प्रोत्साहित केले आणि बिचारीला बिघडविले. बरकत नसेल तरीही आपल्यात बरकत आहे असे ती मनात मानून घेते, तर म्हणे, का असे मानून घेतले? असे का मानले? तर पुरुषांनीच तिला पुन्हा पुन्हा सांगितले, म्हणनू तिला वाटते की हे म्हणतात, 'त्यात काय चुकीचे आहे ?' असेच काही तिने मानून घेतलेले नाही. तुम्ही म्हणतात की, खूप छान आहेस. 'तुझ्या सारखी स्त्री तर असूच शकत नाही. तिला म्हटले की, 'तू सुंदर आहेस.' तर ती स्वत:ला सुंदर मानुन घेते. या पुरुषांनी स्त्रियांना स्त्रीरुपातच ठेवले. आणि स्त्रीला असे वाटते की, मी पुरुषांना मूर्ख बनवते. असे करुन पुरुष स्त्रियांना