________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
सुद्धा ती सती होऊ शकते. जेव्हापासून निश्चय केला तेव्हापासून ती सती होऊ शकते.
77
प्रश्नकर्ता : जस-जसे सतीच्या गुणांची जोपासना केली जाईल तस-तसे कपट विरघळत जाईल.
दादाश्री : सतीचे गुण अंगिकारले तर कपट आपोआपच निघत जाते. तुम्हाला काही सांगावे लागत नाही. जी मूळ (जन्मतः ) सती असते तिला पूर्वीचे काहीच डाग नसतात. तुमचे पूर्वीचे डाग राहून जातात आणि नंतर परत तुम्ही पुरुष होता. सतीत्वाने सर्व संपूष्टात येते. जितक्या सती होऊन गेल्या, त्यांचे सर्व पूर्ण होऊन जाते आणि त्या मोक्षाला जातात. थोडे समजले का ? मोक्षाला जाण्यासाठी सती व्हावे लागेल. हो, जितक्या सती होऊन गेल्या, त्या सर्व मोक्षाला गेल्या, अन्यथा पुरुष व्हावे लागते.
प्रश्नकर्ता : हो, म्हणजे असे निश्चित नाही की जी स्त्री आहे तिला अनेक जन्मांपर्यंत स्त्रीचाच जन्म मिळेल. परंतु लोकांना हे समजत नाही आणि म्हणून त्यावर काही उपाय केला जात नाही.
दादाश्री : उपाय केला तर स्त्री, ही पुरुषच आहे. ह्या ग्रंथीला जाणतच नाहीत बिचारे. आणि त्यांना तिथे इन्टरेस्ट येतो, तिथे मजा वाटते. म्हणून तिथे पडून राहतात. आणि दुसऱ्या कोणाला अशा मार्ग माहितही नाही, म्हणून कोणी दाखवतही नाही. हे फक्त सती स्त्रिया एकट्याच जाणतात. सतींना त्यांचे पती, त्या एका पतीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करत नाहीत. कधीच नाही लग्न होताच तिचा पती मेला, निघून गेला तरीही नाही. त्या पतीलाच ती आपला पती मानते. मग अशा स्त्रियांचे कपट पूर्णपणे नष्ट होते.
ह्या मुली बाहेर जात असतील, शिकण्यासाठी जात असतील तरीही शंका. बायकोवर सुद्धा शंका. सगळीकडे दगाफटका! घरात सुद्धा दगाच आहे ना, आजकाल ! या कलियुगात तर स्वतःच्या घरातच दगा होत असतो. कलियुग म्हणजेच दगाफटक्याचा काळ. कपट आणि दगा, कपट आणि दगा, कपट आणि दगा ! हे सर्व कोणत्या सुखासाठी करतात ? आणि ते सुद्धा भान न ठेवता, बेभानपणे !