________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
तो दगड एवढा मोठा राहणार नाही, पण त्याचे कण-कण वेगळे होऊन सर्वत्र पसरतील !
73
परस्त्रीच्या जोखीमेचा विचार केला तर त्यात कितीतरी जोखिम आहेत! ती जिथे जाईल तिथे तुम्हाला जावे लागेल, तिला आई बनवावी लागेल! आज अशी पुष्कळ मुले आहेत की जे त्यांच्या पूर्वजन्मात ठेवलेल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले आहेत. ह्या सर्व गोष्टी माझ्या ज्ञानात सुद्धा आल्या होत्या. (मागील जन्मी ) मुलगा उच्च जातीचा असतो आणि आई खालच्या जातीची असते, आई खालच्या जातीत जाते आणि (तिचा होणारा) मुलगा उच्च जातीमधून खालच्या जातीत परत येतो. किती भयंकर जोखिम ! मागील जन्मी जी पत्नी होती, ती ह्या जन्मात आई बनते. आणि ह्या जन्माची आई ती पुढील जन्मी पत्नी बनते. असे हे जोखिमवाले जग आहे ! थोडक्यातच समजुन घ्या ! प्रकृति विषयी नाही, ही गोष्ट मी दुसऱ्या संर्दभात सांगितलेली परंतु हे तर आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की फक्त हे एकच जोखिम आहे. प्रश्नकर्ता : दोन्ही पक्ष सहमत असतील तरीही जोखिम आहे
का ?
दादाश्री : सहमत असतील तरीही जोखिम आहे. दोघेही एकमेकांशी खुश असतील त्याने काय होते ? ती जिथे जाणार असेल तिथे तुम्हाला जावे लागेल. तुम्हाला मोक्षाला जायचे आहे आणि तिचे धंदे हे असे असतील. तर तुमची काय अवस्था होईल ? गुणाकार ( दोघांचा हिशोब ) केव्हा जुळतील ? म्हणूनच प्रत्येक शास्त्राकारांनी प्रत्येक शास्त्रात विवेकाबद्दल सांगितले आहे की लग्न करा. नाहीतर असा भटका ढोर असेल तर कोण्याचे घर सलामत राहू शकेल ? मग ‘सेफसाइड' राहिलीच कुठे? राहणारच नाही. तू का बोलत नाहीस ? मागच्या काळजीत पडलास काय ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : मी तुझे (पाप) धुऊन देईल. आम्हाला तर तुमच्याकडून इतकेच अपेक्षीत आहे की मला भेटल्यानंतर आता तरी कोणतीही दखल