________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
71
दादाश्री : तिथे असा विषय नसतो. यात तर नुसती घाण आहे. देव तर उभेही राहणार नाहीत. तिथे त्यांचा विषय कसा असतो? फक्त देवी आली आणि तिला पाहिले, यातच त्यांचा विषय पूर्ण झाला, बस! कित्येक देवी-देवतांना तर असे असते की दोघांनी एकमेकांना हाताने स्पर्श केला किंवा समोरासमोर दोघांनी हात दाबून ठेवले यातच त्यांचा विषय पूर्ण झाला. देवी-देवतांमध्ये सुद्धा जसे-जसे उच्च देवलोकात येतात, तस-तसा विषय कमी होत जातो. कित्येक तर फक्त एकमेकांशी बोलले की त्यांचा विषय पूर्ण होऊन जातो. ज्यांना स्त्रीचा सहवास आवडतो असेही देवता आहेत आणि ज्यांना सहजच असे एक तास देवीला भेटले तरीही खूप आनंद होतो, असेही देवता आहेत आणि कित्येक असेही देवता आहेत की ज्यांना स्त्रीची गरजच पडत नाही. अतः असे प्रत्येक प्रकारचे देवलोक आहेत.
[5] बिनहक्काचे विषयभोग, नर्काचे कारण
परस्त्री आणि परपुरुष प्रत्यक्ष नर्काचे कारण आहेत. नर्कात जायचे असेल तर तिथे जाण्याचा विचार करा. आम्हाला त्याची हरकत नाही. तुला अनुकूल असेल तर त्या नर्काच्या दुःखाचे वर्णन करतो, ते ऐकताच ताप चढेल, तर जेव्हा तू तिथे भोगशील तेव्हा तुझी काय अवस्था होईल? परंतु स्वत:ची पत्नी असेल तर त्यास काही हरकत नाही.
पति-पत्नीच्या संबंधाला निसर्गाने स्वीकारलेले आहे. त्यात जर कधी विशेषभाव झाला नाही तर मग त्यात काही हरकत नाही. निसर्गाने इतके मान्य केले आहे. इतका परिणाम पापरहित म्हटला जातो. परंतु त्यात अन्य पाप खूपच आहेत. एकच वेळा विषय भोगल्याने करोडो जीव मरतात. हे काय कमी पाप आहे? पण तरीही ते परस्त्री सारखे मोठे पाप नाही म्हटले जात.
प्रश्नकर्ता : नर्कात जास्त करुन कोण जातात?
दादाश्री : शील लुटणाऱ्यांना सातवी नर्क आहे. जितके गोड वाटले असेल, त्याहून अनेक पटीने कडूपणा अनुभवतो, तेव्हा मग तो नक्की करतो की आता नर्कात जायचे नाही. तात्पर्य, या जगात न