________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
नाही ! आपल्या हिंदुस्तानाची तर किती डेवलप प्रजा! आपल्याला तर मोक्षाला जायचे आहे!
____ अब्रह्मचर्याचे तर असे आहे की ह्या जन्मात पत्नी झाली असेल, किंवा दूसरी रखैल (ठेवलेली स्त्री) असेल तर पुढील जन्मात ती स्वत:ची मुलगी होऊन येते, अशी या संसाराची विचित्रता आहे. म्हणूनच समंजस माणसे ब्रह्मचर्य पाळून मोक्षाला गेले ना!
[4] एक पत्नीव्रत म्हणजेच ब्रह्मचर्य ज्याने लग्न केले आहे, त्याच्यासाठी आम्ही एकच नियम ठेवला आहे की तू (पत्नीशिवाय) दुसऱ्या कुठल्याही स्त्री वर दृष्टी बिघडवायची नाही. आणि जर कधी दृष्टी बिघडली तर प्रतिक्रमण विधी करायची आणि नक्की करायचे की पुन्हा कधी असे करणार नाही. स्वत:च्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्री कडे बघत नाही, दुसऱ्या स्त्री वर ज्याची दृष्टी जात नाही, दृष्टी गेली तरी त्याच्या मनात विकारी भाव उत्पन्न होत नाहीत, विकारी भाव झाला तर स्वतः खूप पश्चाताप करतो, त्यास या काळात एक पत्नी असून सुद्धा ब्रह्मचर्य म्हटले जाते.
आजपासून तीन हजार वर्षांपूर्वी हिंदुस्तानात शंभरा पैकी नव्वद माणसे एक पत्नीव्रत पाळत होते. एक पत्नीव्रत आणि एक पतिव्रत; किती चांगली माणसे होती ती! परंतु आता तर कदाचित हजारात एखादा असा असेल!
प्रश्नकर्ता : समजा जर दोन बायका असतील तर त्यात काय वाईट आहे?
दादाश्री : करा ना दोन बायका. करण्यात हरकत नाही. पाच बायका करा तरीही हरकत नाही. पण इतर स्त्रियांवर दृष्टी बिघडवतो, दुसरी स्त्री जात असेल तिच्यावर दृष्टी बिघडवतो त्यास खराब म्हटले जाते. काही नीती-नियम तर असायला हवेत ना?
पुन्हा लग्न करण्यास हरकत नाही. मुसलमानांनी एक कायदा केला की, बाहेर दृष्टी बिघडवायची नाही. बाहेर कोणालाही छेडायचे