________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
67
[2] दृष्टी दोषांचे जोखिम
आता तर सर्व खुल्ला बाजारच होऊन गेला आहे ना ? म्हणून संध्याकाळी असे वाटते की काहीच सौदा केलेला नाही, पण असेच बघता बघता बारा सौदे होऊनच गेलेले असतात ! पाहिल्याबरोबरच सौदा होऊन जातो. दुसरे सौदे होणार असतील ते होतील, पण हे तर पाहताक्षणीच सौदा होऊन जातो! आपले ज्ञान असेल तर असे होत नाही. स्त्री जात असेल तर तिच्या आत तुम्हाला शुद्धात्मा दिसेल, पण इतर लोकांना शुद्धात्मा कसा दिसेल ?
एखाद्याच्या घरी आपण लग्नाला गेलो असू, त्या दिवशी आपण खूप काही पाहतो ना ? शंभर सौदे तरी होऊनच जातात ना ? तर हे सर्व असे आहे! यात तुझा दोष नाही ! मनुष्यमात्रला असेच होत असते. कारण की आकर्षणवाले काही बघितले तर तिथे दृष्टी खेचलीच जाते. यात स्त्रियांनाही असे आणि पुरुषांनाही असेच होत असते. आकर्षणवाले पाहिले की सौदा होऊनच जातो!
हे विषय बुद्धीने दूर करु शकू असे आहेत. मी विषयांना बुद्धीनेच दूर केले होते. ज्ञान जरी नसेल तरीही विषय हे बुद्धीने दूर होऊ शकतात. हे तर कमी बुद्धिवाले आहेत म्हणून विषयात टिकून राहिलेले आहेत.
[3] बिनहक्काची गुन्हेगारी
तू जर संसारी असशील तर तुझ्या हक्काचे विषय भोग, पण बिनहक्काचे विषय तर भोगूच नकोस. कारण याचे फळ भयंकर आहे. आणि जर तू त्यागी असशील तर तुझी दृष्टी विषयाकडे जाताच कामा नये ! बिनहक्काचे घेणे, बिनहक्काची इच्छा करणे, बिनहक्काचे विषय भोगण्याची भावना करणे, याला पाशवता म्हणतात. हक्क आणि बिनहक्क या दोन्हीमध्ये लाईन ऑफ डिमार्केशन (भेद रेषा) तर असायलाच हवी ना? आणि त्या डिमार्केशन लाईनीच्या बाहेर जायचेच नाही. तरी पण लोक डिमार्केशन लाईनीच्या बाहेर गेलेलेच आहेत ना ? हीच पाशवता आहे. यालाच पाशवता म्हणतात. हक्काचे भोगण्यास हरकत नाही.