________________
74
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
नाही ना? मागील दखल असेल, तर त्यातून सोडवण्यासाठी आमच्याजवळ पुष्कळ उपाय आहेत. तू मला खाजगीत सांगत जा. मी तुला लगेचच धुऊन देईल. कलियुग आहे म्हणून चूक होणार नाही, असे तर शक्यच नाही ना?
एकाशी डायवोर्स (घटस्फोट) घेऊन दुसऱ्यासोबत लग्न करण्याची इच्छा असेल तर त्याची हरकत नाही, परंतु लग्न करावे लागेल. अर्थात त्याची काहीतरी बाउन्ड्री (सीमारेषा) असली पाहिजे. 'विदाउट बाउन्ड्री' अर्थात् हरैया ढोर म्हटले जाईल. मग त्यात आणि मनुष्यात काही फरक राहत नाही.
प्रश्नकर्ता : रखेल (बिन लग्नाची ठेवलली स्त्री) ठेवली असेल तर?
दादाश्री : रखेल असली, तरीपण ते रजिस्टर्ड(मान्य)असले पाहिजे. आणि मग दुसरी नसावी.
प्रश्नकर्ता : यात रजिस्टर करु शकत नाही, केले तर मग संपत्तीत हिस्सा मागते, खूप झंझटी होतात.
दादाश्री : संपत्ती तर द्यावी लागेल, जर आपल्याला स्वाद घ्यायचा असेल तर! सरळ राहा ना एक जन्म, का असे वागता? अनंत जन्मांपासून हेच करत आला आहे! एक जन्म तर सरळ राहा ना! सरळ झाल्याशिवाय सुटकाच नाही. साप देखील बिळात शिरताना सरळ होतो की वाकडा चालतो?
प्रश्नकर्ता : सरळ चालतो. परस्त्रीमध्ये जोखिम आहे, आणि ते चुकीचे आहे हे आजच समजले. आतापर्यंत तर यात काय चुकीचे आहे? असेच वाटत होते.
दादाश्री : तुम्हाला कोणत्याही जन्मात कोणी 'हे चुकीचे आहे' असा अनुभवच करुन दिला नाही, नाहीतर या घाणीत कोण पडेल? त्यात आणखी नर्काचीही जबाबदारी येते!
आपले हे विज्ञान मिळाल्यानंतर हार्टिली (हृदयापासून) पश्चाताप