________________
68
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : बिनहक्काचे भोगण्यात कोणती वृत्ति काम करत असते? दादाश्री : आपली दानत खोटी आहे, ती वृत्ति.
हक्काचे सोडून दुसऱ्या ठिकाणी 'प्रसंग' (विषय संबंध) बनला तर ती स्त्री जिथे जाईल, तिथे आपल्याला जन्म घ्यावा लागेल. ती अधोगतित गेली तर आपल्यालाही तिथे जावे लागेल. आजकाल बाहेर तर असेच सर्व चालू आहे. 'कुठे जन्म होईल?' त्याचा काही नेम नाही. बिनहक्काचे विषय ज्याने भोगले असेल, त्याला तर भयंकर यातना भोगाव्या लागतात. त्याची मुलगी पण एखादया जन्मात चारित्र्यहीन होते. नियम कसा आहे, की ज्याच्यासोबत बिनहक्काचा विषय भोगला असेल तीच नंतर आई किंवा मुलगी बनते.
हक्काच्या विषयासाठी तर भगवंताने सुद्धा मनाई केलेली नाही. भगवंताने मनाई केली तर भगवंत गुन्हेगार ठरेल. हो, बिनहक्काची मनाई केली आहे. जर पश्चाताप केला तर सुटूही शकतो. पण हा तर बिनहक्काचे आनंदाने भोगतो, म्हणून गाठ घट्ट होते.
बिनहक्काचे भोगण्यात तर पाचही महाव्रतांचे दोष लागतात. यात हिंसा होत असते, खोटेपणा येतो, ही तर सर्रास चोरी म्हटली जाईल. बिनहक्काचे अर्थात सर्रास चोरी म्हटली जाते. मग त्यात अब्रह्मचर्य तर येतेच आणि पाचवे परिग्रह, हे तर सर्वात मोठे परिग्रह आहे. हक्काचा विषय असेल त्यांच्यासाठी मोक्ष आहे पण बिनहक्काचा विषय असलेल्यांसाठी मोक्ष नाही. असे भगवंतांनी म्हटले आहे ! ___या लोकांना तर कसले भानच नसते ना! आणि हरैया (निरंकुश, भटकणारे बेवारस पशु) सारखे असतात. हरैया म्हणजे तुम्ही समजलात का? तुम्ही कोणी हरैयाला पाहिलेत का? हरैया म्हणजे ज्याचे हातात आले त्याचे खाऊन टाकतो. या म्हँस-बंधुला तुम्ही ओळखता का? ते सर्व शेत उध्वस्त करुन टाकतात.
अशी खूप कमी माणसं आहेत की ज्यांना याचे थोडे तरी महत्व समजले आहे. बाकी तर जोपर्यंत मिळाले नाही तोपर्यंत हरैया नाही! मिळाले की हरैया व्हायला वेळच लागत नाही. हे आपल्याला शोभत