________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
विष आहे. आता मला काहीही नडणार नाही, असे वाटणे हेच विष आहे. निडरता शब्द मी यासाठी दिला आहे की विषयाला घाबरले पाहिजे, नाईलाजास्तव विषयात पडावे लागले तरच पडावे. म्हणून विषयाला घाबरा, असे म्हटले आहे. कारण की भगवंत सुद्धा घाबरत होते, मोठेमोठे ज्ञानी सुद्धा घाबरत होते, तर तुम्हीच असे कसे आहात की तुम्हाला विषयाची भीती वाटत नाही ? समजा स्वादिष्ट जेवण आले असेल, आमरस-पोळी वैगेरे, हे सर्व तुम्ही निवांत खा परंतु घाबरत खा. घाबरुन का खायचे की जर जास्त खाल्ले गेले तर उपाधि ( त्रास) होईल. म्हणून घाबरा.
65
प्रश्नकर्ता : शुद्धात्मा स्वरुप झाल्यानंतर पत्नीसोबत संसार व्यवहार करावा की नाही? आणि ते कसे भाव ठेवून ? इथे समभावे निकाल
कसा करावा ?
दादाश्री : हा व्यवहार तर, तुम्हाला पत्नी असेल तर पत्नीसोबत, तुम्ही दोघांना समाधानकारक होईल असा व्यवहार ठेवावा. तुमचे समाधान आणि तिचेही समाधान होईल असा व्यवहार ठेवावा. तिचे असमाधान होत असेल आणि तुमचे समाधान होत असेल असा व्यवहार करु नका. तसेच आपल्याकडून पत्नीला काहीही दुःख होता कामा नये.
मी तुम्हाला सांगतो की, हे जे 'औषध' (विषय संबंध) आहे हे गोड लागणारे औषध आहे. म्हणून ज्याप्रमाणे औषध नेहमी प्रमाणानूसार घेत असतो, त्याच प्रमाणे हेही प्रमाणातच घ्या. लग्नजीवन केव्हा शोभून दिसेल ? तर जेव्हा दोघांनाही ताप चढेल तेव्हा ते औषध घेतील तेव्हा. तापाशिवाय औषध घेतात की नाही ? एकाला ताप नसेल आणि औषध घेतले, तर ते लग्नजीवन शोभून दिसत नाही. दोघांना ताप असेल तरच औषध घ्यावे. धीस इज द ओन्ली मेडिसिन ( हे फक्त एक औषधच आहे) औषध जरी गोड असले तरीही ते काही दररोज पिण्यासारखे नसते.
पूर्वी राम-सीता वैगेरे सर्व होऊन गेले, ते सर्व संयमवाले होते. पत्नीसोबत संयमी ! तेव्हा हा असंयम काय दैवी गुण आहे ? नाही, तो पाशवी गुण आहे. मनुष्यात असे नसावे. मनुष्य असंयमी असायला नको. जगाला माहितच नाही की विषय काय आहे? एका वेळेच्या विषयात करोडो जीव मरुन जातात. फक्त एकाच वेळेत. समज नसल्यामुळे यात