________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
____ 63
काही तुम्हा सर्वांना अशी ब्रह्मचर्याची आज्ञा दिली नाही ना? आणि तशी आज्ञा आम्ही लवकर देतही नाही. कारण की सर्वांना पाळता येत नाही, जमत नाही. त्यासाठी तर मन खूप मजबुत असावे लागते.
जर तुला ब्रह्मचर्य पाळायचे असेल तर इतके सावध रहायचे की परपुरुषाचा विचार देखील येता कामा नये. आणि विचार आलाच तर ताबडतोब (प्रतिक्रमण करुन) धुऊन टाकायचा.
एक शुद्धचेतन आहे आणि एक मिश्रचेतन आहे. मिश्रचेतनात जर फसलात तर आत्मज्ञान प्राप्त केले असेल, तरीही त्याला भटकवते. म्हणजे यात विकारी संबंध झाला तर भटकावे लागते. कारण आपल्याला मोक्षाला जायचे आहे आणि जर त्या व्यक्तिचा जन्म तीर्यंचगतीत (पशु) होणार असेल तर आपल्यालाही तिथे खेचून जाईल. विकारी संबंध झाला म्हणून तिथे जावेच लागते. म्हणून विकारी संबंध उत्पन्नच होणार नाही इतकेच पहायचे. मनानेही बिघडलेले नसेल तेव्हा चारित्र्य म्हटले जाते. त्यानंतर हे सर्व तयार होऊन जातील. मन बिघडले तर मग सर्व फ्रेक्चर होऊन जाते. नाहीतर एक-एका मुलीत कितीतरी शक्ति असते! आणि ती काय अशी-तशी शक्ति आहे का? ह्या तर हिंदुस्तानातील स्त्रिया असतील आणि त्यांच्याजवळ वीतरागांचे विज्ञान असेल, मग काय बाकी राहिले?
'ज्ञानी पुरुषां' कडून स्वत:चे कल्याण करुन घ्यायचे आहे. स्वतः कल्याणस्वरुप झाला की मग बोलल्याशिवायच लोकांचे कल्याण होते. आणि जी लोकं बोलत राहतात त्यांच्याकडून काहीही होत नाही. फक्त भाषणे केल्याने, बोल बोल केल्याने काही होत नसते. बोलल्याने तर उलट बुद्धि इमोशनल (भावुक) होते. अगदी सहजपणेच फक्त ज्ञानींचे चारित्र्य पाहिल्याने, त्यांचे दर्शन केल्यानेच सर्व भाव शमून जातात. म्हणून त्यांनी तर मात्र स्वतःच ते रुप होऊन जाण्यासारखे आहे ! 'ज्ञानी पुरुषांजवळ राहून ते रुप व्हावे. अशा फक्त पाचच मुली तयार झाल्या तर त्या कितीतरी लोकांचे कल्याण करतील!' संपूर्णपणे निर्मळ व्हायला हवे. आणि 'ज्ञानी पुरुषां' जवळ निर्मळ होऊ शकतात आणि निर्मळ होणारही आहेत!