________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
61
कोणालाही असेल का? एखादा मनुष्य सुंदर दिसत असेल परंतु जर त्याला सोलून काढले तर आतून काय निघेल? एखादा मुलगा चांगले कपडे घालून, नेकटाई-बेकटाई घालून बाहेर जात असेल, पण त्याला जर कापले तर त्यातून काय निघेल? उगाच तू नेकटाई कशाला घालतोस? मोहवाल्या लोकांना भान नाही. ते सुंदरता पाहून गोंधाळून जातात बिचारे ! जिथे मला तर सर्व स्पष्ट(जसे आहे तसे) आरपार दिसते.
अशा रितीने स्त्रियांनी पुरुषांना पाहायला नको आणि पुरुषांनी स्त्रियांना पाहायला नको. कारण की ते आपल्या उपयोगाचे नाही. दादांजींनी सांगितले होते की. हाच कचरा आहे, मग यात पाहण्यासारखे काय राहिले?
__ म्हणजे आकर्षित होण्याचेही कायदे आहेत की अमुक ठराविक ठिकाणीच आकर्षण होत असते. प्रत्येक ठिकाणी काही आकर्षण होत नाही. आता हे आकर्षण कशामुळे होते, ते तुम्हाला सांगतो.
ह्या जन्मात आकर्षण होत नसेल, तरीही एखाद्याला पाहिले, की आपल्या मनात विचार येतो 'ओहोहो, हा पुरुष किती सुंदर आहे, देखणा आहे.' असे आपल्याला वाटले की त्याचबरोबर पुढील जन्माची गाठ पडते. यामुळे मग पुढील जन्मी आकर्षण होते.
निश्चय त्यास म्हणतात की जे कधी विसरणारच नाही. आपण शुद्धात्म्याचा निश्चय केला आहे. ते विसरत नाही ना? थोडा वेळ जरी विसरलो, तरी नंतर पुन्हा लक्षात येतेच. यालाच निश्चय म्हणतात.
निदिध्यासन म्हणजे 'ही स्त्री सुंदर आहे किंवा हा पुरुष देखणा आहे' असा विचार केला अर्थात तितका वेळ ते निदिध्यासन झाले. विचार केला की लगेचच निदिध्यासन होते. मग तो स्वतः तसा होऊन जातो. म्हणजे आपण जर असे पाहिले तरच ही झंझट उभी राहते ना? त्यापेक्षा डोळे खाली करुनच चालले पाहिजे, दुसऱ्यांशी नजर मिळवूच नये. संपूर्ण जग एक फसवणूकच आहे. एकदा फसल्यानंतर सुटकाच नाही. कितीतरी जन्म व्यतित होतात, पण तरीही त्याचा अंत येतच नाही!