________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
एक अवतारी होऊन मोक्षाला जायचे आहे, आता फळाला कुठे ठेवायचे ? त्या फळाच्या बदल्यात तर शंभर स्त्रिया मिळतील, पण अशा फळाला काय करायचे आपण ? आपल्याला फळ नको. फळ खायचेच नाही ना आता!
59
म्हणून मला तर त्यांनी आधीच विचारुन घेतले होते की, 'आम्ही हे जे सर्व करतो याच्याने आमचे पुण्य बांधले जाते का ?' मी म्हटले 'नाही बांधले जाणार.' आता हे सर्व डिस्चार्ज रुपात आहे आणि बीज तर शेकले जात आहे सर्व .
प्रश्नकर्ता : हे जे सर्व ब्रह्मचारी होतील, हे 'डिस्चार्ज 'च म्हटले जाईल ना ?
दादाश्री : हो, डिस्चार्जच ! पण ह्या डिस्चार्ज सोबत त्यांचा जो भाव आहे, तो आत चार्ज होत आहे. आणि भाव असेल तरच ताकद राहते ना! अन्यथा डिस्चार्ज नेहमीच फिके पडून जाते. आणि हा त्यांचा भाव आहे की, आम्हाला ब्रह्मचर्य पाळायचेच आहे, त्याच्याने मजबुती राहते. या अक्रम मार्गात कर्ताभाव किती आहे, किती अंशपर्यंत आहे की आम्ही जी आज्ञा दिली आहे ती आज्ञा पाळायची, इतकाच कर्ताभाव आहे. जिथे कुठलीही गोष्ट पाळावीच लागते तिथे कर्ताभाव आहे. म्हणजे 'ब्रह्मचर्य पाळायचेच आहे.' यात पाळणे हा कर्ताभाव आहे, बाकी ब्रह्मचर्य हे तर डिस्चार्ज आहे.
प्रश्नकर्ता : परंतु ब्रह्मचर्य पाळणे हा कर्ताभाव आहे का ?
दादाश्री : हो, पाळणे हा कर्ताभाव आहे. आणि या कर्त्याभावाचे फळ त्यांना पुढील जन्मात सम्यक् पुण्य मिळेल. म्हणजे काय तर कुठल्याही अडचणींशिवाय सहजपणे सर्व वस्तु उपलब्ध होतील आणि असे करत करत मोक्षाला जायचे. तीर्थंकरांचे दर्शन होईल आणि तीर्थंकरांच्या जवळ राहण्याची संधी पण मिळेल. अर्थात् त्याचे सर्व संयोग खूपच सुंदर असतील.
प्रश्नकर्ता : रविवारचा उपवास आणि ब्रह्मचारी यांचे काय कनेक्शन (अनुसंधान) आहे ?