________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मग आमच्या आज्ञेत राहू शकतो. नाहीतर ब्रह्मचर्याची शक्ति जर नसेल तर आज्ञेत कशा प्रकारे राहू शकाल ? ब्रह्मचर्याच्या शक्तिची तर गोष्टच वेगळी ना ?
58
हे ब्रह्मचारी तयार होत आहेत आणि ह्या ब्रह्मचारिणी पण तयार होत आहेत. यांच्या चेहऱ्यावर जेव्हा तेज येईल तेव्हा मग त्यांना लिपस्टिक आणि पावडर चोपडण्याची गरज उरणार नाही. ओहो ! सिंहाचे बाळ बसले आहे असे वाटेल. तेव्हा वाटेल की हो, काहीतरी आहे ! हे वीतराग विज्ञान कसे आहे की जर पचले तर सिंहिणीचे दुध पचल्यासारखे आहे, तेव्हा सिंहाच्या बाळासारखे ते वाटतील, नाहीतर ते बकरीसारखे दिसतील !!!
प्रश्नकर्ता : हे लोक लग्न करण्याचे नाकारत आहेत, तर त्याला अंतराय कर्म नाही का म्हटले जाणार ?
दादाश्री : आपण इथून भादरण गावी जाण्यासाठी निघालो, म्हणून काय आपण दुसऱ्या गावांसोबत अंतराय (विघ्न) पाडले? त्यांना जे अनुकूल वाटेल तिथे ते जातील. अंतराय कर्म तर कोणाला म्हणतात की समजा तुम्ही कोणाला काही देत असाल, आणि मी तुम्हाला म्हणेल की, याला देण्यासारखे नाही. म्हणजे मी तुम्हाला आंतरले, म्हणून मला ती वस्तू कधी मिळणार नाही. मला त्या वस्तूचे अंतराय पडले. प्रश्नकर्ता : जर ब्रह्मचर्यच पाळायचे असेल तर, त्याला कर्म म्हणू शकतो का ?
दादाश्री : हो, त्याला कर्मच म्हटले जाते ! त्याचाने कर्म तर बांधलेच जाईल! जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत कर्म म्हटले जाईल! मग ते ब्रह्मचर्य असो की अब्रह्मचर्य असो. ब्रह्मचर्याने पुण्यकर्म बांधले जाते आणि अब्रह्मचर्याने पापकर्म बांधले जाते !
प्रश्नकर्ता : कोणी ब्रह्मचर्याची अनुमोदना करत असेल, ब्रह्मचारींना पुष्टि देत असेल, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देत असेल, सर्वकाही करत असेल तर त्याचे फळ काय येईल ?
दादाश्री : फळाचे आपल्याला काय करायचे ? आपल्याला तर