________________
56
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
अविवाहित ब्रह्मचर्य स्थिती आणि दूसरे लग्न करुन ब्रह्मचर्य पाळत असेल, त्यात उत्कृष्ट कोणते?
दादाश्री : लग्न करुन ब्रह्मचर्य पालन केले जाते ते उत्कृष्ट म्हटले जाते. परंतु लग्न करुन ब्रह्मचर्य पाळणे कठीण आहे, आपल्या येथे कित्येक लोक लग्न करुन ब्रह्मचर्याचे पालन करत आहेत, पण ते चाळीशी पुढचे आहेत.
__ विवाहितांना देखील शेवटची दहा-पंधरा वर्ष सोडावे लागेल. सर्वांपासून मुक्त व्हावे लागेल. महावीर स्वामी पण शेवटेच बेचाळीस वर्ष मुक्त झाले होते ना! या संसारात स्त्री सोबत तर अमर्याद उपाधि
आहे. जोडी बनली की उपाधि वाढते. दोघांची मने कशी एक होतील? किती वेळा मन एक होते? समजा, दोघांनाही कढी आवडते, पण मग भाजीचे काय? तिथे मन एक होत नाही आणि काम बनत नाही. मतभेद असेल तिथे सुख असू शकत नाही.
ज्ञानी पुरुष तर 'ओपन टू स्काय' (आकाशासारखे मोकळे) असतात. रात्री वाटेल त्यावेळी त्यांच्या घरी जा, तरी 'ओपन' टू 'स्काय' च असतात. आम्हाला तर ब्रह्मचर्य पाळावे लागते असे नसते. आम्हाला तर विषयाची आठवणही नसते. ह्या शरीरात ते परमाणूच नसतात ना! म्हणून तर ब्रह्मचर्यसंबंधी अशी वाणी निघते! विषयसंबंधी तर कोणी काही बोललेच नाही. लोकं विषयी आहेत म्हणून लोकांनी विषयासंबंधी उपदेशच केला नाही. आणि आम्ही तर संपूर्ण पुस्तक तयार होईल एवढे सारे ब्रह्मचर्यासंबंधी बोललो आहोत, अगदी शेवटपर्यंतची गोष्ट बोललो आहोत. कारण की आमच्यातील ते परमाणूच संपलेले आहेत, देहाच्या बाहेर आम्ही रहात असतो, बाहेर म्हणजे शेजाऱ्यासारखे निरंतर राहत असतो! नाहीतर असे आश्चर्य मिळणारच नाही ना कधीही?
फळ खाल्ले परंतु पश्चातापासहित खाल्ले तर मग त्या फळामधून पुन्हा नवीन बीज पडत नाही, आणि जर आनंदाने खाल्ले की 'आहोहो, आज तर खूप मज्जा आली,' तर मग पुन्हा नवीन बीज पडते.
खरे तर विषयाच्या बाबतीत लटपटायला होते. सहजही सैल