________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
[ 16 ] घसरणाऱ्यांना, उठवून धावयला लावतात......
तुम्हाला तर 'घसरुन पडायचे नाही,' असे नक्की करायचे आहे आणि जर घसरलात तर मी माफ करायचे. जर आत तुमचे बिघडू लागले तर लगेच मला कळवा. जेणे करुन त्यावर काही उपाय होऊ शकेल! पटकन थोडीच सुधरणार आहे ? हो, बिघडण्याचीही शक्यता असते !
54
असे आहे की, ह्या अपराधाचे फळ काय आहे, हे जोपर्यंत जाणत नाही, तोपर्यंत ते अपराध होतच राहणार. विहिरीत का कोणी पडत नाही ? हे वकिल कमी गुन्हे करतात, असे का ? तर ह्या गुन्हाचे हे फळ मिळेल, असे त्यांना माहित असते. म्हणून अपराधाचे फळ काय आहे हे जाणले पाहिजे. आधीच जाणून घ्यावे की, अपराधाचे फळ काय मिळेल? हे चुकीचे करत आहे. त्याचे फळ काय मिळेल ? हे माहित करुन घेतले पाहिजे.
ज्याला दादांचे निदिध्यासन राहते, त्याचे सर्वच ताळे उघडतात. दादांसोबत अभेदता हेच निदिध्यासन आहे ! ! ! खूप पुण्य असेल तेव्हा असे (निदिध्यासन) राहते. आणि ज्ञानींच्या निदिध्यासनाचे साक्षात फळ मिळते. ते निदिध्यासन, स्वतःच्या शक्तिला त्यानुसार करते, तद्रुप बनवते. कारण की 'ज्ञानीं' चे अचिंत्य चिंतामणी स्वरुप आहे, म्हणून ते रुप करुन टाकते. 'ज्ञानी' चे निदिध्यासन निरालंब बनवते. मग 'आज सत्संग झाला नाही, आज दर्शन झाले नाही' असे काही त्याला वाटत नाही. ज्ञान स्वतः निरालंब आहे, तसेच स्वतःलाही निरालंबी व्हावे लागते, 'ज्ञानीं' च्या निदिध्यासनाने.
ज्याने जगत कल्याणाचे निमित्त बनण्याचा वसा घेतला आहे, त्याला जगात कोण अडवू शकेल ? अशी कोणतीही शक्ति नाही की त्याला अडवू शकेल. संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व देवलोक त्याचावर फुलांचा वर्षाव करीत आहेत. म्हणून ते एक ध्येय नक्की करा ना ! जेव्हापासून नक्की केले तेव्हापासूनच या शरीराला आवश्यक असणाऱ्या वस्तुंची चिंता करावी लागत नाही. जोपर्यंत संसारीभाव आहेत तोपर्यंत आवशक्यतेची चिंता करावी लागते. पहा ना, या 'दादां' चे कसे ऐश्वर्य आहे! ही एकच प्रकारची इच्छा उरली की मग त्याचे कामच झाले.