________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
एखादी स्त्री उभी असेल तिला पाहिले, पण ताबडतोब दृष्टी मागे घेतली, तरी सुद्धा दृष्टी तर पुन्हा तिथल्या तिथेच जाते, अशी जर दृष्टी पुन्हा-पुन्हा तिथेच आकर्षित होत राहिली तर तिला 'फाईल' म्हटली जाते. म्हणजे एवढीच चूक या काळात समजून घ्यायची आहे. ___प्रश्नकर्ता : अजून जास्त स्पष्टीकरण करुन सांगा की दृष्टी निर्मळ कशी करावी?
दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' या जागृतित आले तर मग दृष्टी निर्मळ होते. दृष्टी निर्मळ झाली नसेल तर शब्दांनी पाच-दहा वेळा बोलावे की, 'मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे' तरीही निर्मळ होईल. अथवा दादा भगवानांसारखा निर्विकारी आहे, निर्विकारी आहे असे बोलल्यानेही होईल. त्याचा उपयोग करावा लागतो, दुसरे काही नाही. हे तर विज्ञान आहे, त्वरित फळ देते आणि थोडेही बेसावध राहिलात तर दुसरीकडे उडवून टाकेल असे आहे!
प्रश्नकर्ता : वास्तवात जागृती मंद कशाने होते?
दादाश्री : एकदा त्यावर आवरण येते. त्या शक्तिचे रक्षण करणारी जी शक्ति आहे ना, त्या शक्तिवर आवरण येत असते, ती काम करणारी शक्ति कुंठित होऊन जाते. तेव्हा मग जागृति मंद होत जाते. ती शक्ति कुंठित झाली की मग काहीही होऊ शकत नाही. ती परिणामकारक राहत नाही. मग तो पुन्हा मार खाईल, मार खातच राहील. मग त्याचे मन, वृत्ती, हे सर्व देखील त्याला उलटे समजावतात की, 'आता आपल्याला काही हरकत नाही. इतके सर्व तर आहे ना?
प्रश्नकर्ता : त्या शक्तिला रक्षण देणारी शक्ति म्हणजे काय?
दादाश्री : एकदा स्लिप झाला(घसरला), तर आत स्लिप न होण्याची जी शक्ति होती, ती कमी होते. अर्थात ती शक्ति सैल होत जाते. म्हणजे जसे बाटलीचे बूच सैल झाल्यावर बाटली जर आडवी पडली तर दुध बाटलीतून आपोआप बाहेर निघते, आणि आधी तर आपल्याला बूच काढावे लागत होते.