________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
51
_ 'मी शुद्धात्मा आहे' हे निरंतर लक्षात राहते, हे सर्वात महान ब्रह्मचर्य. याच्यासारखे दूसरे ब्रह्मचर्य नाही. तरीही आत जर आचार्यपद प्राप्त करण्याची भावना असेल तर तिथे बाहेरील ब्रह्मचर्य सुद्धा पाहिजे, त्याला स्त्री असलेली चालत नाही.
___फक्त हे एक अब्रह्मचर्य जरी सोडले तरी संपूर्ण संसार मावळतो, भराभर, वेगाने! फक्त ब्रह्मचर्य पाळल्याने तर संपूर्ण जगच समाप्त होऊन जाते ना! नाहीतर हजारो वस्तू सोडल्या, तरीही काही भलं होत नाही.
ज्ञानी पुरुषांकडून चारित्र्य ग्रहण केले, फक्त ग्रहणच केले आहे, अजून पालन तर केलेच नाही, तरीसुद्धा तेव्हापासूनच खूप आनंद वाटतो. तुला थोडाफार आनंद वाटतो का?
प्रश्नकर्ता : वाटतो ना, दादा! त्याचवेळी आत सर्व निरावरण होऊन गेले.
दादाश्री : घेतल्याबरोबरच निरावरण झाले ना? घेते वेळी त्याचे मन क्लीयर (निर्मळ) असायला पाहिजे. त्याचे मन त्यावेळी क्लीयर होते, ते मी जाणून घेतले होते. याला चारित्र्य ग्रहण केले असे म्हटले जाते ! व्यवहार चारित्र्य! आणि ते 'पाहणे' व 'जाणणे' ठेवले, ते झाले निश्चय चारित्र्य! चरित्र्याचे सुख या जगाने समजलेलेच नाही. चरित्र्याचे सुख तर वेगळ्याच प्रकारचे असते.
प्रश्नकर्ता : विषयापासून सुटला असे केव्हा म्हटले जाते? दादाश्री : त्याला नंतर विषयासंबंधी एकही विचार येत नाही.
विषयासंबंधी कोणतेही विचार नाहीत, ती दृष्टी नाही, ती लाइनच नाही. जणु काही तो जाणतच नाही अशा प्रकारचे असते, त्याला ब्रह्मचर्य म्हटले जाते.
[15] 'विषय विकारा' समोर 'विज्ञान'ची जागृति
प्रश्नकर्ता : ही गोष्ट स्वतःला कशी समजेल की यात स्वतः तन्मयाकार झाला आहे?