________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
केली म्हणजे मग पाच जन्मानंतर-दहा जन्मानंतर पूर्णाहुती होऊनच जाते ना! एका जन्मात तर कदाचित संपणारही नाही.
लोकांना हे माहितच नाही की हा विचार आला तर काय होईल? ते तर म्हणतात की विचार आला त्यात काय बिघडले? लोकांना हे माहित नसते की विचार आणि डिस्चार्ज या दोघांची लिंक(संबंध) कशा प्रकारे आहे. विचार जर आपोआप येत नसतील, तर बाहेर पाहिल्याने सुद्धा उत्पन्न होतात. । [14] ब्रह्मचर्य प्राप्त करविते ब्रह्मांडाचा आनंद!
या कलियुगात, या दुषमकाळात ब्रह्मचर्य पाळणे खूप कठीण आहे. आपले ज्ञान असे थंडगार आहे की त्यामुळे आत नेहमी गारवा राहतो, म्हणून ब्रह्मचर्य पाळू शकतो. बाकी अब्रह्मचर्य कशामुळे आहे ? आतील जळजळीमुळे आहे. पूर्ण दिवस काम करुन जळण, निरंतर जळण उत्पन्न झाली आहे. हे ज्ञान आहे म्हणून मोक्षाला जाण्यासाठी अडचण नाही, परंतु त्याच सोबत ब्रह्मचर्य असेल तेव्हा मग त्याचा आनंद ही असाच असेल ना?! अहोहो... अपार आनंद, जगाने अनुभवलाच नसेल असा आनंद उत्पन्न होतो! अशा ब्रह्मचर्य व्रतातच राहून जर त्याने पस्तीस वर्षाचा काळ काढला, तर त्यानंतर अपार आनंद उत्पन्न होते!
ब्रह्मचर्य व्रत घेण्याची सर्वांनाच गरज नसते. हे तर ज्याच्या उदयात येते, आत ज्याला ब्रह्मचर्याचे खूप विचार येत असतील, तो मग ब्रह्मचर्य व्रत घेतो. ज्याला ब्रह्मचर्य वर्तत असेल, त्याच्या दर्शनाची तर गोष्टच वेगळी ना! एखाद्याच्याच उदयात येते, त्याच्यासाठीच ब्रह्मचर्य व्रत आहे. उदयात आलेले नसेल तर उलट अडचण होते. ब्रह्मचर्य व्रत वर्षभरासाठी घेऊ शकतो किंवा सहा महिन्याचे सुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला ब्रह्मचर्याचे खूप विचार येत असतील, त्या विचारांना तुम्ही दाबत राहिलात तरी सुद्धा विचार येत असतील तरच ब्रह्मचर्याचे व्रत मागावे; नाहीतर हे ब्रह्मचर्य व्रत मांगण्यासारखे नाही. इथे ब्रह्मचर्य व्रत घेतल्या नंतर व्रत तोडणे हा भयंकर अपराध आहे. तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नाही की तुम्ही व्रत घेतलेच पाहिजे.