________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मला लाज वाटते. तेव्हा मी म्हणालो, 'काय लाज वाटते? बरं मग लिहून दे.' तोंडाने सांगायला लाज वाटते तर लिहून दे. तेव्हा तो म्हणाला की मला महिन्यातून दोन-तीन वेळा डिस्चार्ज होऊन जातो. त्यावर मी म्हणालो, 'अरे वेड्या, त्यात इतके कशाला घाबरतोस! तुझी दानत तर तशी नाही ना? तुझी दानत खोटी आहे का?' तेव्हा म्हणतो, 'अजिबात नाही, मुळीच नाही.' त्यावर मी म्हणालो, 'तुझी दानत शुद्ध असेल तर ते ब्रह्मचर्यच आहे. तेव्हा म्हणतो, पण असे होते का? मी म्हणालो, भाऊ, ते गलन नाही. ते तर पुरण झालेले गलन होते. त्यात तुझी दानत बिघडणार नाही असे ठेव. तेवढे सांभाळ. दानत बिघडायला नको की यात सुख आहे. आतल्या आत दुःखी होत होता बिचारा! असे सांगून टाकले तर लगेच शुद्ध करुन देतो.
समजा आता मनात विषयाचा विचार आला, आणि लगेच तन्मायाकार झाला म्हणून आतील भरलेला माल गळून खाली जातो (सूक्ष्मात स्खलन होतो) खाली गेला की मग सर्व जमा होऊन निघून जाते पटकन, परंतु जर विचार आल्याबरोबर लगेच त्याला उपटून फेकून दिले तर मग आत गळत नाही, ऊर्ध्वगामी होते. म्हणजे आत असे संपूर्ण विज्ञान आहे! संपूर्ण!
प्रश्नकर्ता : विचार येताक्षणी?
दादाश्री : ऑन दी मोमेन्ट(त्याच क्षणी). बाहेर निघत नाही परंतु आतल्या आतच वेगळा झाला. म्हणजे जो माल बाहेर निघण्यालायक झाला तो मग शरीरात टिकत नाही.
प्रश्नकर्ता : वेगळे झाल्यानंतर जर प्रतिक्रमण केले तर पुन्हा वर चढणार नाही, किंवा ऊर्ध्वगमन होणार नाही का?
दादाश्री : प्रतिक्रमण केले तर काय होते की तुम्ही असा अभिप्राय दाखवता की, आम्ही त्यापासून वेगळे आहोत, आम्हाला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही.
भरलेला माल आहे तो तर निघाल्याशिवाय राहणार नाही. विचार आला आणि त्याला पोषण दिले, तर वीर्य कमजोर होते. म्हणून कुठल्याही