________________
48
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रकारे डिस्चार्ज होऊन जाते. आणि जर आत टिकले, म्हणजे विषयाचा विचारच आला नाही तर ऊर्ध्वगामी होते. वाणी वगैरे सर्वच मजबुत होऊन निघते. नाहीतरी विषयाला आम्ही संडास म्हटलेलेच आहे. हे जे उत्पन्न होते ते संडास होण्यासाठीच उत्पन्न होते. ब्रह्मचर्य पाळतो त्याला सर्व प्राप्त होते. स्वत:च्या वाणी, बुद्धी, समज या सर्वांमध्ये, प्रकट होते. अन्यथा बोललेल्या वाणीचा प्रभाव पडत नाही, वाणी परिणामकारक होतच नाही. वीर्याचे ऊर्ध्वगमन झाले की मग वाणी फर्स्टक्लास निघते आणि सर्व शक्ति उत्पन्न होतात. सर्व आवरणे तुटून जातात.
विषयाचा विचार केव्हा येतो? तर सहज कुठे पाहिले आणि आकर्षण झाले की विचार येतो. एखाद्या वेळी असे पण होते की आकर्षण झाल्याशिवाय विचार येतो. विषयाचा विचार आला म्हणजे मनात ताबडतोब मंथन सुरु होते आणि सहजही मंथन झाले की मग ते स्खलन होऊनच जाते, लगेचच, ऑन दी मोमेन्ट. म्हणून आपण रोपटे उगवण्या आधीच उपटून फेकून दिले पाहिजे. दूसरे सर्व चालते, पण हे विषयरुपी रोप खूपच दुःखदायी आहे, ज्या माणसाची संगत नुकसानकारक असेल त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. म्हणूनच शास्त्रकारांनी असे सर्व नियम ठेवलेले की ज्या जागेवर स्त्री बसली असेल त्या जागेवर बसू नये, जर ब्रह्मचर्य पाळायचे असेल तर, आणि संसारी राहायचे असेल तर तुम्ही बसू शकता.
प्रश्नकर्ता : खरे तर विचार येऊच नये ना?
दादाश्री : विचार तर आल्याशिवाय राहणार नाही. आत भरलेला माल आहे म्हणून विचार तर येईल, पण त्यावर प्रतिक्रमण हा उपाय आहे. विचार येऊच नये असे होईल तर तो अपराध आहे.
प्रश्नकर्ता : अर्थात (विषयाचा विचारच येणार नाही) तशी स्टेज यायला पाहिजे?
दादाश्री : हो पण विचार न येणे, अशी स्थिती तर दीर्घ काळापासून, डेवलप होत होत पुढे जातो, तेव्हा येते. प्रतिक्रमण करत करत पुढे जातो, तेव्हा मग त्याची पूर्णाहुती होते ना! प्रतिक्रमण करायला सुरुवात