________________
50
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
या काळात तर आयुष्यभरासाठी ब्रह्मचर्य व्रत देता येईल असे शक्य नाही. देणे हेच जोखिम आहे. वर्षभरासाठी देऊ शकतो. पण जर संपूर्ण आयुष्यभराची आज्ञा घेतली आणि मग व्रतभंग केले, तर तो स्वतः तर पडतोच आपल्यालाही त्यात निमित्त बनवतो. जर आपण महाविदेह क्षेत्रात वीतराग भगवंताजवळ बसलेले असू, तर तिथेही येऊन आपल्याला उठवेल आणि म्हणेल, 'कशासाठी आज्ञा दिली होती? तुम्हाला शहाणपणा करायला कोणी सांगितले होते? वीतराग भगवंताजवळ सुद्धा आपल्याला निवांतपणे बसू देणार नाही! म्हणजे स्वतः तर पडेल पण दुसऱ्यालाही
ओढून घेऊन जाईल. म्हणून भावना कर आणि आम्ही तुला भावना करण्याची शक्ति देत आहोत. पद्धतशीर भावना कर, घाई करु नकोस. जितकी घाई तितकी कमतरता.
जर हे ब्रह्मचर्य व्रत घेशील आणि त्याला संपूर्णपणे पाळशील, तर वडमध्ये आश्चर्यकारक स्थान प्राप्त करशील आणि इथून सरळ एकावतारी बनून मोक्षाला जाशील. आमच्या आज्ञेत बळ आहे, जबरदस्त वचनबळ आहे. जर तू कमी पडला नाहीस तर व्रत तुटणार नाही, एवढे सारे वचनबळ आहे.
तोपर्यंत आत सर्व चांगले तपासून पाहावे की भावना जगत कल्याणाची आहे की मान मिळवण्याची? स्वत:च्या आत्म्याची परिक्षा करुन तपासून पाहिले तर सर्व समजेल असे आहे. कदाचित आत मान असेल तर तोही निघून जाईल.
___ एकच खरा माणूस असेल तर तो जगाचे कल्याण करु शकेल! संपूर्ण आत्मभावना असली पाहिजे. एक तास सतत भावना करत रहा. आणि कदाचित तुटली तर जोडून पुन्हा चालू कर..
__ जास्तीत जास्त जगाचे कल्याण केव्हा होते? त्यागमुद्रा असते तेव्हा अधिक होते. गृहस्थमुद्रेत जगाचे कल्याण जास्त प्रमाणात होत नाही, वरकरणी सर्व होते. परंतु आतील स्तरावर सगळीच माणसं प्राप्त करु शकत नाहीत! वरुन सर्व मोजका वर्ग प्राप्त करुन घेतो, पण सर्वसामान्य जनता प्राप्त करु शकत नाही. त्याग आपल्यासारखा असायला पाहिजे. आपला त्याग अहंकारपूर्वकचा नाही ना?! आणि हे चारित्र तर खूप उच्च म्हटले जाते!