________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
55
आणि दैवी सत्ता तुमच्या सोबत आहे. हे देव तर सत्ताधीश आहेत, ते निरंतर तुम्हाला मदत करतील, अशी त्यांची सत्ता आहे. असे एकच ध्येय असलेल्या पाचच व्यक्तिंची आवश्यकता आहे. दूसरे कोणतेच ध्येय नाही, एक मात्र पक्के ध्येय! अडचणीत पण एकच ध्येय आणि झोपेत पण एकच ध्येय!
सावध रहा. आणि 'ज्ञानी पुरुषां' चा आसरा जबरदस्त ठेवा. संकट कधी येईल हे सांगता येत नाही! पण त्यावेळी 'दादां' ची मदत मागाल, साखळी ओढाल तर 'दादा' हजर होतील!
तुम्ही शुद्ध असाल तर कोणी तुमचे नाव घेऊ शकणार नाही! संपूर्ण जग जरी तुमचे विरोधी झाले तरी मी एकटा तुमच्या सोबत आहे. मला माहित आहे की तुम्ही शुद्ध आहात, म्हणून मी वाटेल त्याला गाठू शकेल असा आहे, मला शंभर टक्के खात्री पटली पाहिजे. तुमच्याकडून जगाला गाठणे शक्य नाही, म्हणून मला तुमची बाजू घ्यावी लागते. तेव्हा अजिबात घाबरु नका. आपण जर शुद्ध आहोत, तर जगात कोणीही आपले नाव घेऊ शकणार नाही! या जगात जर कुणीही दादांबद्दल बोलत असेल तर हा 'दादा' या जगाचा सामना करु शकेल. कारण तो संपूर्ण शुद्ध माणूस आहे, ज्याचे मन जरा सुद्धा बिघडलेले नाही. _[17] अंतिम जन्मातही ब्रह्मचर्य तर आवश्यक
ब्रह्मचर्याला तर संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. ब्रह्मचर्याशिवाय तर कधीही आत्म प्राप्ती होऊ शकतच नाही. जो ब्रह्मचर्याच्या विरुद्ध असेल त्याला कधीही आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. विषयासमोर तर निरंतर जागृत राहावे लागते, एका क्षणासाठी सुद्धा अजागृती चालत नाही.
प्रश्नकर्ता : ब्रह्मचर्य आणि मोक्ष यांचा एकमेकांशी संबंध किती?
दादाश्री : खूप घेणे-देणे आहे. ब्रह्मचर्याशिवाय तर आत्म्याचा अनुभव समजणारच नाही ना! आत्म्यात सुख आहे की विषयात सुख आहे हे समजणारच नाही ना?!
प्रश्नकर्ता : तर आता दोन प्रकारचे ब्रह्मचर्य आहेत. एक,